टीम इंडियाचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते तीन सामन्यांची वनडे तर पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. यापैकी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज पार पडली असून यात भारताचा 2-1 ने पराभव झाला. त्यानंतर आता 29 ऑक्टोबर पासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ हा सामना खेळेल. मात्र 25 ऑक्टोबर रोजी सिडनी येथे झालेल्या शेवटच्या वनडेत टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यरला कॅच पकडताना गंभीर दुखापत झाली. त्याला सोमवारी आयसीयूमध्ये दाखल केल्याची माहिती समोर आली होती. तेव्हा आता श्रेयस अय्यरची तब्येत(health) कशी आहे याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने माहिती दिली आहे.

सिडनीत वनडे सामन्यात श्रेयस अय्यर कॅच पकडण्यासाठी विरुद्ध दिशेला पळाला. अय्यरने बॉल पकडण्यासाठी उडी मारली आणि बॉल पकडण्यात त्याला यश आलं. मात्र यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो डाव्या बाजूला पडला. त्यानंतर, अय्यर वेदनेने कळवळत होता. आऊट झाल्यानंतर कॅरी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, जमिनीवर पडलेला अय्यर वेदनेने तडफडत होता. दरम्यान, फिजिओ मैदानावर आला आणि दुखापतीची तपासणी केल्यानंतर अय्यरला मैदानाबाहेर नेले.
दुखापत गंभीर स्वरुपाची असून आता त्याला अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरला बरगडीच्या दुखापतीमुळे(health) अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रेयस मैदानातून ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर, अय्यरच्या शरीराचे तापमान, नाडीचा वेग आणि रक्तदाबात चढ-उतार होत असल्याचं लक्षात आलं. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. सूत्राने सांगितले की, ‘टीमचे डॉक्टर आणि फिजिओने कोणताही धोका न पत्करण्याची भूमिका स्वीकारली. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची प्रकृती स्थिर आहे. परंतु ही दुखापत श्रेयससाठी प्राणघातक ठरु शकली असती. तो खूप सक्षम, कणखर आहे आणि तो लवकरच बरा होईल’. मंगळवारी सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार श्रेयसला आयसीयूमधून बाहेर काढण्यात आले असून वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

@RevSportzGlobal कडून एक व्हिडीओ प्रकाशित करण्यात आला यात टी 20 सीरिजसाठी टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने श्रेयसच्या तब्येतीची अपडेट दिली. सूर्यकुमार यादवने म्हटले की, ‘ज्या दिवशी मला तो जखमी झाल्याचे कळले, तेव्हा मी त्याला आधी फोन केला. पण जेव्हा मला कळले की त्याच्याकडे फोन नाही, तेव्हा मी माझ्या फिजिओला फोन केला. त्यांनी सांगितले की तो स्थिर आहे. पहिला दिवस कसा होता हे मी सांगू शकत नाही, पण आता तो बरा दिसत आहे. दोन दिवसांपासून आम्ही बोलत आहोत. तो प्रतिसाद देत आहे. याचा अर्थ त्याची प्रकृती स्थिर आहे’.
हेही वाचा :
सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण…
नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद?
१ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम..