आपल्या आजीच्या हातचे चवदार लोणचे आठवले की एक गोष्ट नक्की लक्षात येते — त्या नेहमी लोणचे काचेच्या किंवा मातीच्या बरणीत साठवायच्या. पण आजच्या आधुनिक काळात अनेक जण सोयीसाठी प्लास्टिकच्या (plastic)डब्यांमध्ये लोणचे ठेवतात. मात्र, ही सोय आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

तज्ज्ञांच्या मते, प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये लोणचे ठेवणे कर्करोगाचा धोका वाढवू शकते. लोणच्यातील तेल, मीठ आणि मसाले प्लास्टिकच्या संपर्कात आल्यावर त्यातून बीपीए आणि थॅलेट्स सारखी हानिकारक रसायने बाहेर पडतात. ही रसायने लोणच्यात मिसळून आपल्या शरीरात जातात आणि संप्रेरक (हार्मोनल) प्रणालीत व्यत्यय आणतात. परिणामी थायरॉईड, हार्मोनल असंतुलन आणि कर्करोगासारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते.
डॉ. तरंग कृष्णा यांनी सोशल मीडियावर याबाबत स्पष्ट इशारा देत सांगितले की, “सोयीच्या नावाखाली आपण आपल्या आरोग्याशी तडजोड करत आहोत. लोणच्याला जपायचे असेल तर ते काचेच्या, चिकणमातीच्या किंवा स्टीलच्या भांड्यातच साठवा.”तज्ज्ञ सांगतात की लोणच्यातील मीठ आणि तेल प्लास्टिकमधून(plastic) विषारी रसायने अधिक वेगाने शोषून घेतात. यामुळे लोणचे केवळ चवदार राहात नाही तर ते हळूहळू शरीरासाठी विषारी ठरते. त्यामुळे घरातील लोणचे जर अजूनही प्लास्टिकच्या डब्यात असेल, तर ते ताबडतोब काचेच्या किंवा सिरॅमिकच्या बरणीत हलवावे, असा सल्ला दिला आहे.

काचेची, सिरॅमिकची किंवा चिकणमातीची भांडी लोणच्याची नैसर्गिक चव आणि पोषक द्रव्ये टिकवून ठेवतात तसेच कोणत्याही हानिकारक रासायनिक प्रतिक्रियांपासून संरक्षण देतात. या पारंपरिक पद्धतीमुळे लोणचे जास्त काळ टिकते आणि आरोग्यासही सुरक्षित राहते.थोडक्यात, आजीच्या काळातील सवयी आज विज्ञानानेही योग्य ठरवल्या आहेत — लोणचे नेहमी काचेच्या किंवा मातीच्या बरणीतच साठवावे. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही लोणचे चाखाल, तेव्हा ते कोणत्या भांड्यात ठेवले आहे हे जरूर पाहा — कारण चव आणि आरोग्य दोन्ही एकत्र जपणे हेच खरे शहाणपण आहे.
हेही वाचा :
‘मी अश्वत्थामाच जो कधीच…’, श्रेयस अय्यर असं का म्हणाला…
आजचा बुधवार ‘या’ राशींसाठी लकी…
शरद पवारांना धक्का! ‘या’ बड्या नेत्यांचा अजित पवाराच्या राष्ट्रवादीत प्रवेश..