राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र(caste validity) सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच राज्याच्या दीर्घकालीन विकास आराखड्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटलाही मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली आहे.

‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हा आराखडा राज्याच्या सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. या व्हिजन डॉक्युमेंटच्या (caste validity)अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट (VMU)’ स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील नागरिकांकडून मते आणि सूचना मागवून, त्यांचे एआय-आधारित विश्लेषण करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या डॉक्युमेंटमध्ये १६ प्रमुख संकल्पना आणि १०० उपक्रम निश्चित करण्यात आले असून, त्यांचा भर प्रगतीशील, शाश्वत आणि सुशासन या तत्त्वांवर आहे.

दुसऱ्या महत्त्वाच्या निर्णयानुसार, नगरविकास विभाग आणि ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राखीव जागांसाठी निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची अतिरिक्त मुदत देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९, तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागासाठी देखील ‘महाराष्ट्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत देणे, अध्यादेश २०२५’ काढण्यास मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिक वेळ मिळणार असून, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.

हेही वाचा :

8 व्या वेतन आयोगाला मंजूरी; 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार

डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील धक्कादायक पोस्टमॉर्टेम रिपोर्ट समोर…

पुरुष समाजावर होतोय अन्याय…जवळ उभं राहिल्याने काकूंनी केला आरडा ओरडा….Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *