मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची आणि सुरक्षा वाढवणारी सुविधा लवकरच सुरू होणार आहे. दूरसंचार नियामक मंडळ आणि दूरसंचार विभाग यांनी ‘कॉलर नेम डिस्प्ले’ ही नवी सुविधा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, कोणताही कॉल आल्यावर त्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचे KYC मध्ये नोंदवलेले नाव थेट मोबाईल(True Caller) स्क्रीनवर दिसणार आहे. यामुळे अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या फसवणुकीच्या कॉल्सना मोठा आळा बसण्याची शक्यता आहे.

या सेवेची खास गोष्ट म्हणजे, ती सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी डिफॉल्ट स्वरूपात सक्रिय केली जाईल. म्हणजेच, यासाठी वेगळी विनंती करण्याची गरज नाही. मात्र, जर वापरकर्त्यांना ही सेवा नको असेल, तर ते ती डिअॅक्टीव्हेट करू शकतील. ज्यांनी CLIR सुविधा घेतली आहे, त्यांच्या बाबतीत मात्र नाव स्क्रीनवर दिसणार नाही. तसेच, गुप्तचर संस्था, व्हीआयपी आणि विशिष्ट अधिकाऱ्यांना या सेवेतून सूट दिली जाईल.

गेल्या वर्षी या सेवेचे ट्रायल मुंबई आणि हरियाणा सर्कलमध्ये यशस्वीरीत्या घेण्यात आले होते. ट्रायल दरम्यान यामुळे स्पॅम आणि फसवणूक करणाऱ्या कॉल्समध्ये लक्षणीय घट झाली, असे समजते.सध्या ट्रू कॉलरसारख्या(True Caller) थर्ड-पार्टी अॅप्सवर कॉल करणाऱ्याचे नाव अनेकदा चुकीचे दिसते, ज्यामुळे गैरसमज आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते. पण ‘कॉलर नेम डिस्प्ले’ सुविधा लागू झाल्यानंतर, वापरकर्त्यांना थेट KYC-आधारित नाव दिसेल. त्यामुळे कॉल उचलायचा की नाही, हे ठरविणे अधिक सोपे होईल. ट्राय आणि डॉटचा हा उपक्रम मोबाईल सुरक्षेच्या दृष्टीने एक क्रांतिकारक पाऊल मानले जात असून, यामुळे देशातील लाखो वापरकर्त्यांना स्पॅम कॉल्स आणि सायबर फसवणुकीपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
YouTube वर ‘घोस्ट नेटवर्क’चा सापळा! लिंकवर क्लिक करताच धोका
मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी…
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, “ठराविक वयात…”