टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (actress)आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली आहेत. आता, हे जोडपे आनंदाची बातमी देणार असल्याचे समोर आले आहे, जी दिव्यांकाने स्वतः उघड केले आहे. टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या टीव्ही शोद्वारे स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. दिव्यांका आणि विवेकच्या लग्नाला आता नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि चाहते तिला आई म्हणून पाहण्याची उत्सुकता व्यक्त करत आहेत. याचबाबत आता अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.

दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया या दोघांनीही २०१६ मध्ये एकमेकांसोबत लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला आता नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. अशातच आता अभिनेत्री लवकरच प्रेक्षकांचा आनंदाची बातमी देणार असल्याचे समोर आले आहे.
चाहते आता दिव्यांका आणि विवेकच्या घरी नवीन सदस्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिव्यांकाने अलीकडेच एका मुलाखतीत या आनंदाच्या बातमीबद्दल खुलासा केला आहे.

दिव्यांका (actress)म्हणाली, “आम्ही दोघेही सध्या बाळासाठी तयार आहोत असे वाटत आहे. आम्ही घरीही याबद्दल सांगितले आहे.” पुढे म्हणाली, “पण मी नुकताच एक शो साइन केला आहे. मी त्यावर काम करत असताना गर्भवती राहण्याच्या मनःस्थितीत नाही कारण मला माझा वेळ शोसाठी समर्पित करायचा आहे.”मला प्रेग्नंसी आणि शोमध्ये थोडा अंतर हवा आहे. म्हणून, शो संपल्यानंतर आम्ही बाळाच्या नियोजनाचा करण्याचा विचार करू. सध्या तरी काहीही नियोजन नाही, पण कदाचित आम्ही लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी देऊ. असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

हेही वाचा :

अभिनेत्रीने बनियान घालून… आजही विसरता येणार नाहीत ते सीन..

आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो..

25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *