बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, पण यावेळी कारण वेगळं आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला असून त्यात ती नवरीच्या पोशाखात दिसत आहे. तिच्यासोबत प्रसिद्ध अभिनेता संजय मिश्राही वराच्या रूपात दिसल्याने चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. अनेकांनी तर्क लावायला सुरुवात केली की, काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या महिमा चौधरीने आता पुन्हा लग्न(married) केलं का? मात्र काही वेळातच या व्हिडिओमागचं खरं सत्य समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कोणत्याही वास्तविक लग्नाचा नसून ‘दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शूट केलेला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धांत राज यांनी केलं असून महिमा आणि संजय मिश्रा दोघेही प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. प्रमोशनच्या निमित्ताने दोघेही लग्नाच्या पोशाखात एका बिल्डिंगमधून बाहेर येताना आणि कॅमेऱ्याला पोज देताना दिसल्याने हा गैरसमज पसरला.

महिमा चौधरीने यापूर्वी ‘परदेस’, ‘धड़कन’ आणि ‘इमरजन्सी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. नुकतीच ती नेटफ्लिक्सवरील ‘नादानीयां’ या (married)चित्रपटात दिसली होती. दुसरीकडे, संजय मिश्रा हे अनुभवी अभिनेते असून ‘मसान’ आणि ‘हीर एक्सप्रेस’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत.

महिमा चौधरीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिचं २००६ मध्ये बॉबी मुखर्जी यांच्याशी लग्न झालं होतं. २००७ मध्ये त्यांना मुलगी झाली, मात्र २०१३ मध्ये दोघांचं विभक्त होणं झालं. संजय मिश्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं तर त्यांनी दोन विवाह केले असून सध्या ते किरण मिश्रा यांच्याशी विवाहित आहेत.
हेही वाचा :
टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरची पहिली पोस्ट तुफान व्हायरल
लग्नाच्या ९ वर्षांनंतर ही अभिनेत्री देणार गुड न्यूज
लाडकी बहीण योजनेमुळं 5 हजार उमेदवारांच्या भरतीला फटका