भारतीय क्रिकेट (cricket)संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या गंभीर दुखापतीतून सावरत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झेल घेताना त्याच्या बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्राव झाला आणि त्याला काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या त्याची प्रकृती सुधारत असून तो हळूहळू बरा होत आहे. श्रेयसने स्वतः आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे आरोग्याविषयी अपडेट दिला आहे. “मी सध्या रिकव्हर होत आहे आणि दिवसेंदिवस तब्येतीत सुधारणा होत आहे.

मला दिलेल्या सर्व शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत,” असे तो म्हणाला.या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला किमान दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळू (cricket)शकणार नाही. याशिवाय, जानेवारीत न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही त्याचे खेळणे निश्चित नाही, कारण तो अद्याप पूर्ण सराव सुरू करू शकणार नाही.

तज्ज्ञांच्या मते, या दुखापतीचा परिणाम त्याच्या आगामी २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघातील निवडीवर होऊ शकतो. जरी श्रेयसने उत्कृष्ट कामगिरी करत संघात आपले स्थान मजबूत केले असले तरी, त्याच्या अनुपस्थितीत दुसऱ्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. टी-२० विश्वचषक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात खेळला जाणार असून, अय्यर लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा भारतीय संघात परतण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या चाहत्यांकडून त्याच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :
अभिनेत्रीने बनियान घालून… आजही विसरता येणार नाहीत ते सीन..
आहारात एका गोष्टीचे जास्त सेवन केल्यास मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो..
25,000 पेक्षा कमी किमतीत Redmi Note फोन, Amazon वरील ऑफर जाणून घ्या