सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल व्हाईट हाऊसच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली (Murder)आहे. निखिल रवींद्र साबळे (वय 25, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. सांगली) हा घटनेनंतर दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल साबळे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते, तर सध्या तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. संशयित प्रसाद सुतार याचं ओंकार सर्व्हिसिंग सेंटर नावाचं वाहन धुण्याचं ठिकाण व्हाईट हाऊस हॉटेलसमोरच आहे. दोघांमध्ये पूर्वीपासून ओळख होती आणि गुरुवारी दोघेही संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बारमध्ये दारू पिण्यासाठी आले होते.
दारूच्या ग्लासांमधून सुरू झालेली मैत्री काही वेळातच जीवघेण्या वादात बदलली. वाद वाढताच प्रसादने कमरेला लावलेला दातरे असलेला चाकू बाहेर (Murder)काढून निखिलच्या गळ्यावर एकच वार केला. तो वार इतका खोल होता की निखिलच्या मानेतील मांस बाहेर आले आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. प्रसादने वार केल्यानंतर चाकू घटनास्थळीच फेकून दिला आणि दुचाकीवरून पसार झाला.

घटनेनंतर बारमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांना माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर आणि एलसीबी निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार आर्थिक वाद किंवा वैयक्तिक कारणांमुळे हा खून झाला असावा. सध्या पोलिसांनी संशयित(Murder) प्रसाद सुतारच्या शोधासाठी विशेष पथक रवाना केले आहे, आणि संपूर्ण सांगली-पट्टी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
शिल्पा शेट्टीच्या आईची तब्येत बिघडली; लिलावती रुग्णालयाबाहेरचा अभिनेत्रीचा VIDEO व्हायरल
‘शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..
फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच
