बॉलिवूड अभिनेता गोंविदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्या वैवाहिक नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. मात्र गोविंदा(affair) आणि सुनिता यांनी अनेकदा हे दावे फेटाळून लावले आहेत. दोघांनी मीडियासमोर येत कोणीही आम्हाला वेगळं करु शकत नाही असं सांगितलं होतं. दरम्यान सुनिताने पुन्हा एकदा गोविंदाच्या कथित प्रेमसंबंधावर भाष्य केलं आहे. आपण गोविंदाच्या प्रेमसंबंधाबद्दल ऐकलं असून, त्याला ज्या दिवशी रंगेहाथ पकडणार त्यादिवशीच यावर विश्वास ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

पारस एस छाब्रा यांच्या ‘अब्रा का डाबरा शो’ मधील एका पॉडकास्ट दरम्यान, सुनिताला गोविंदाच्या प्रेमसंबंधाबद्दल विचारण्यात आलं. “मी हे अनेक वेळा मीडियाला सांगितलं आहे की मी याबद्दल ऐकलं आहे. पण, जोपर्यंत मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी पाहत नाही किंवा रंगेहाथ पकडत नाही तोपर्यंत मी काहीही जाहीर करू शकत नाही. मी ऐकले आहे की ती एक मराठी अभिनेत्री आहे,” असं सुनिताने स्पष्ट केलं आहे.
ती पुढे म्हणाली, “हे सगळं करण्याचं हे वय नाही. गोविंदाने त्याच्या मुलीला सेटल करण्याचा आणि मुलगा यश यांच्या करिअरचा विचार करायला हवा. पण, मी अफवाही ऐकल्या आहेत आणि म्हणाले आहे की जोपर्यंत मी तोंड उघडत नाही तोपर्यंत कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी मीडियाला असेही सांगितले आहे की मी नेहमीच सत्य बोलेन कारण मी खोटे बोलत नाही.”
सुनिताने महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याचा आणि त्यांच्या पतींच्या उत्पन्नावर अवलंबून राहू नये असा सल्लाही दिला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलबद्दल बोलताना सुनिता म्हणाली, “हे खूप चांगलं चालले आहे. व्लॉगिंग सुरु केल्यानंतर चार महिन्यांत मला यूट्यूबचे सिल्व्हर बटण मिळाले. एका महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजे. स्वतःचे पैसे कमवल्याने एक वेगळ्याच दर्जाचा आनंद मिळतो. तुमचा नवरा पैसे देतो, पण तो 10 वेळा मागितल्यानंतर एकदाच देईल. तुमची स्वतःची कमाई ही तुमची स्वतःची असते”.
आपण मुलगी टीना आणि मुलगा यशसोबत 4 बेडरूमच्या घरात राहत असून गोविंदा त्यांच्यासोबत राहत नाही असाही खुलासा तिने केला आहे. “हे घर आमच्यासाठी लहान आहे. मी या पॉडकास्टद्वारे सांगू इच्छिते, ‘चिची, मला 5 बेडरूमचे एक मोठं घर विकत घे, नाहीतर बघ तुझे काय होते ते”.फेब्रुवारीपासून गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या अफवा उडाल्या आहेत. सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये वैयक्तिक माहिती शेअर केल्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

ईटाइम्सच्या वृत्तानुसार, एका सूत्राने म्हटले आहे की, “सुनीताने काही महिन्यांपूर्वी वेगळे होण्याची नोटीस पाठवली होती, परंतु तेव्हापासून कोणतीही हालचाल झालेली नाही.”काही महिन्यांपूर्वीच दोघांमध्ये समेट झाल्याचे वृत्त आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांनी मीडियासमोर एकत्र फोटो काढले. सुनीता म्हणाली, “जर आमच्यात काही घडले असते तर आज आम्ही इतके जवळ असतो का? आमच्यात अंतर असते. आम्हाला कोणीही वेगळे (affair)करू शकत नाही, देव किंवा राक्षस जरी खाली आला तरी नाही.”गोविंदा आणि सुनीता आहुजाचे लग्न मार्च 1987 मध्ये झाले. 1988 मध्ये त्यांची मुलगी टीना जन्माला येईपर्यंत दोघांनी त्यांचं लग्न गुपित ठेवलं. अनेक वर्षांनंतर, 1997 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा यशवर्धनचे स्वागत केले.
हेही वाचा :
अनिल अंबानींचे दिवस फिरले, राहतं 17 मजली घर जप्त
आधी नवजात बाळाची हत्या, नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर…
SIM अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे