कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग पुन्हा एकदा पेटला आहे. कर्नाटक राज्य स्थापनेच्या दिवशी सीमाभागात ‘काळा दिवस’ पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी खासदार धैर्यशील माने(political) आज (१ नोव्हेंबर) बेळगावकडे रवाना झाले होते. मात्र, कर्नाटक पोलिसांनी कोगनोळी टोल नाक्यावरच त्यांना रोखत प्रवेशबंदी घातली.

या कारवाईनंतर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला. संतप्त माने समर्थकांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले. खासदार माने यांनी पोलिसांच्या(political) कारवाईचा निषेध नोंदवत म्हटले, “मी लोकप्रतिनिधी आहे, आणि मला दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही कृती म्हणजे लोकशाहीवरील गदा आहे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की, कर्नाटक प्रशासनाच्या या वागणुकीविरोधात ते बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंग दाखल करणार आहेत. “मराठी जनतेच्या सन्मानासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर लढू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पोलिसांनी वाढता तणाव लक्षात घेऊन खासदार माने यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे सीमाभागात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध कन्नड अशा भावना उफाळून आल्या असून, दोन्ही राज्यांच्या प्रशासनाची कसोटी लागली आहे.
हेही वाचा :
IPL 2026 मध्ये मोठी अपडेट! युवराज सिंग परतणार…
रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… Video Viral
1 नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती रुपयांची होणार बचत