कोल्हापूरच्या महापौरपदासाठी भाजपकडून रुपाराणी निकम याचं नाव (Kolhapur) जाहीर करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर उपमाहापौरपदासाठी जनसुराज्य पक्षाच्या अक्षय जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, गटनेते मुरलीधर जाधव यांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.येत्या 6 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी आणि अमोल येडगे यांनी आमंत्रित केली आहे. यात निकम यांची अधिकृत निवड होणार आहे. सुरुवातीला महापौर पदासाठी प्रमोद देसाई, विजयसिंह देसाई, वैभव कुंभार यांची नावं चर्चेत होती. याशिवाय सर्वसाधारण गटातून रूपाराणी निकम आणि विजयसिंह खाडे पाटील यांचीही नावे समोर आली होती. मात्र, यापैकी निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपला कोणी खुंटीवर (Kolhapur) देखील टांगायला तयार नव्हते. पण आता दिवस बदलले भाजप एक ब्रँड झाला आहे. स्थायी समितीचे सभापती पदही भाजपच घेणार आहे. मी आई अंबाबाईचे खूप आभार मानतो. मी साष्टांग दंडवत घालतो. कारण ब्रँडेड भाजपचा महापौर कोल्हापूर महानगरपालिकेत निवडला जात आहे. आम्ही लोकल कमिटीला सुचवा असं सांगितले होते, त्यानंतर सहा नावे सुचविण्यात आली होती. त्यातील रूपाराणी संग्रामसिंह निकम यांचे नाव निश्चित करण्यात आले.पुढे ते म्हणाले, राजकारणात कोणतीही गोष्ट आज ठरवलेली उद्या करता येईल असं नसतं. कोणत्याही पद्धतीचा विचार न करता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आज जे ठरलं ते जाहीर करा असं सांगितलं.

स्थायीच्या निवडणुकीच्या आधी स्थायीची नावं द्यायची आहे. (Kolhapur) इतर विभागाच्या निवडणुकी वेळी देखील अशाच पद्धतीने नावे दिली जाणार आहे. टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहोत.उपमहापौर पदासाबाबत बोलताना ते म्हणाले, उपमहापौर पद शिवसेनेला दिले आहे. शिवसेनेने ठरवायचे आहे त्यांचा उपमहापौर की जनसुराज्य पक्षाचा. महापौर पदाची खांडोळी होता कामा नये असं देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले आहे. त्यामुळे आमच्या नेत्याची इच्छा म्हणजे आमच्यासाठी ती आज्ञा आहे. त्यामुळे जास्त लोक अड्जस्ट करताना देवेंद्रजी यांची इच्छा ही आज्ञा मानून आम्ही काम करू, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.

हेही वाचा :

एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम

8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *