पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि वकील(lawyer) अॅड. असीम सरोदे यांच्यावर मोठी कारवाई झाली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने त्यांची वकिलीची सनद रद्द केली आहे. न्यायव्यवस्था आणि इतर संवैधानिक पदांविरोधात सार्वजनिक ठिकाणी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हा निर्णय घेण्यात आला.अॅड. सरोदे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारी काही वादग्रस्त विधाने केली होती. याच विधानांच्या आधारे एका तक्रारदाराने त्यांच्याविरोधात बार काऊन्सिलकडे धाव घेतली.

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल करण्यात आलेल्या या तक्रारीत, सरोदे यांची वक्तव्ये अशोभनीय, बेजबाबदार आणि बदनामीकारक असल्याचा आरोप करण्यात आला. या विधानांमुळे न्यायव्यवस्थेचा घोर अपमान झाला असून न्यायालयांप्रती जनतेमध्ये अविश्वास निर्माण होत असल्याचे तक्रारीत म्हटले होते.या गंभीर तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने एक त्रिसदस्यीय चौकशी (lawyer)समिती स्थापन केली होती. या समितीचे अध्यक्षपद अॅड. विवेकानंद घाटगे यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

अॅड. घाटगे यांच्यासोबत या समितीत अॅड. संग्राम देसाई आणि अॅड. नेल्सन राजन यांचा सदस्य म्हणून समावेश होता. या समितीने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर, अॅड. असीम सरोदे यांच्यावर वकिलीची सनद रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा :
५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद…
‘गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी अफेअर…’
अनिल अंबानींचे दिवस फिरले, राहतं 17 मजली घर जप्त