तुमच्या Gmail चा ईनबॉक्स देखील रोजच्या ऑफर्स, न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्सने भरलेला असतो का? इतके ईमेल पाहून कधी कधी आपल्याला संताप येतो. कारण या सर्व ईमेल्समुळे स्टोरेज देखील लवकर फुल्ल होतं. याशिवाय दुसरी समस्या म्हणजे एखादा महत्त्वाचा मेल शोधताना युजर्सना (Gmail)अडचण येते. तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करावा लागत आहे का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Google ने अलीकडेच त्यांच्या Gmail सर्विससाठी एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे नवीन फीचर ईमेल सब्सक्रिप्शन मॅनेजमेंट या नावाने सादर करण्यात आलं आहे. या फीचर अंतर्गत युजर्सना त्यांच्या Gmail चा ईनबॉक्स क्लिन ठेवण्यासाठी मदत होणार आहे. हे फीचर कसं काम करतं आणि युजर्स कशा पद्धतीने या नवीन फीचरचा वापर करू शकतात, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Gmail च्या या नवीन फीचरची सर्वात चांगली गोष्ट म्हणजेच आता तुम्ही कोणत्याही वेबसाईट किंवा ब्रँडचे ईमेल थेट Gmail अ‍ॅपमधून अनसब्सक्राइब करू शकणार आहेत. यापूर्वी युजर्सना ऑफर्स, न्यूजलेटर्स आणि प्रमोशनल ईमेल्स अनसब्सक्राइब करण्यासाठी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन किंवा वेगवेगळे ईमेल्स ओपन करावे लागत होते. मात्र आता हे संपूर्ण काम केवळ एका क्लिकवर होणार आहे. Gmail च्या या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स त्यांचे सर्व ईमेल्स अगदी सहज मॅनेज करू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही न्यूजलेटर, ऑफर आणि प्रमोशनल मेसेज किंवा ब्रँड्सचे ब्लॉग अपडेट सारखे ईमेल एका क्लिकमध्ये डिलीट केले जाऊ शकतात.

या नवीन फीचरचा फायदा असा असणार आहे की, Gmail स्टोरेज रिकामं होईल आणि युजर्सना त्यांच्यासाठी महत्त्वाचा असलेला ईमल शोधणं सोपं होणार आहे. याशिवाय युजर्स एखाद्या खास ब्रँड्सचे सर्व ईमेल्स एकत्र डिलीट करू शकणार आहेत. याशिवाय नवीन ईमेल्स येऊ नये यासाठी अनसब्सक्राइब(Gmail) देखील करू शकणार आहेत.या फीचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी Gmail अ‍ॅप ओपन करा. यानंतर वर दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नवीन Manage Subscriptions सेक्शन दिसेल. इथे तुम्हाला तुम्ही सब्सक्राइब केलेले सर्व ईमेल्स दिसणार आहे. तुम्ही आता कोणत्याही ब्रँड किंवा वेबसाइटवरील ईमेल अनसब्सक्राइब करू शकता. तुम्हाला आता नको असलेल्या ईमेलचा त्रास होणार नाही.

हेही वाचा :

सत्तेविरुद्ध सत्याचा मोर्चा आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह?

ऊस चाऊन खाताय की रस पिताय? आरोग्यास अधिक प्रभावी काय, घ्या जाणून

iPhone यूजर्ससाठी धक्का…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *