प्रवर्तन निदेशालयाने आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 3,084 कोटी रुपयांची संपत्ती अस्थायी जप्त केली आहे. ही कारवाई 31 ऑक्टोबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत करण्यात आली. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुंबईतील पाली हिल येथील अनिल अंबानी यांचे आलिशान 17 मजली घर(house) ‘Abode’, तसेच देशातील इतर आठ शहरांमधील मालमत्तांचा समावेश आहे.

पाली हिलमधील ही 66 मीटर उंच, 16 हजार चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत पश्चिम मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठित भागात आहे. या आलिशान घरात स्विमिंग पूल, जिम, मोठं गॅरेज आणि हेलिपॅडसह सर्व आधुनिक सुविधा आहेत. अंबानी कुटुंब अनेक वर्षांपासून या घरात वास्तव्यास असून, हे घर(house) त्यांच्या श्रीमंती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. मात्र आता ही संपत्ती सरकारच्या ताब्यात गेली आहे.
NDTVच्या अहवालानुसार, ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये दिल्लीतील रिलायन्स सेंटर, तसेच नोएडा, गाजियाबाद, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी येथे असलेल्या ऑफिस स्पेस, रहिवासी फ्लॅट्स आणि जमिनीच्या तुकड्यांचा समावेश आहे.

ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, रिलायन्स समूहातील दोन आर्थिक कंपन्यांनी सामान्य नागरिक आणि बँकांकडून घेतलेला पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला असल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवरच ईडीने मोठ्या प्रमाणात संपत्ती जप्त करून पुढील चौकशी सुरू केली आहे.या कारवाईनंतर अनिल अंबानी यांच्या साम्राज्यावर मोठं आर्थिक आणि कायदेशीर संकट ओढवलं असून, या प्रकरणात आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
आधी नवजात बाळाची हत्या, नंतर पतीच्या प्रायव्हेट पार्टवर…
SIM अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी हा Jio चा स्वस्त प्रीपडे प्लॅन, कॉलिंग आणि डेटासह युजर्सना मिळणार हे फायदे
अजित पवारांच्या पक्षाची समर्थकांना थेट तंबी, ‘विषयाच्या संवेदनशीलतेला…’