‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या विनोदी अभिनयाने आणि खास शैलीने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ओंकारचा वैयक्तिक जीवनाबद्दलचा विषय नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अफेअरच्या(proposes) चर्चा अधूनमधून रंगत असतात, तसेच तो लग्न कधी करणार याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. नुकत्याच ‘कविरत स्टुडिओ’ला दिलेल्या मुलाखतीत ओंकारने या सर्व चर्चांवर खुलासा केला आहे.

लग्नाबाबत विचारले असता ओंकारने हसत उत्तर दिलं, “माहित नाही… कोणाकडे मुलगी असेल तर सांगा. अनुरूपवर पण मी रजिस्टर करणार आहे. माझे बाबा म्हणाले, ‘एवढ्या ठिकाणी दिसतोस, तर मग अनुरूपवर का नाही?’… होईल लवकरच काहीतरी,” असं तो म्हणाला.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीला तू प्रपोज (proposes)केलेस का? या प्रश्नावर ओंकार म्हणाला, “हो, केलंय प्रपोज… पण ते स्कीटच्या दरम्यानच झालं. आमचं स्कीट होतं ‘ओंकारची गर्लफ्रेंड शिवाली’, त्यात मी तिला नेहमी काहीतरी टोकत असतो. त्या सीनमध्ये मी नैसर्गिकपणे प्रपोज केलं, आणि तिच्याकडूनही खूप छान रिअॅक्शन मिळाली. त्यामुळे सीन खूप जिवंत वाटला.”

प्राजक्तासोबतच्या नात्याबद्दल बोलताना ओंकार म्हणाला, “ती माझी चांगली मैत्रीण आहे. ती मनाने खूप चांगली आणि काळजी घेणारी मुलगी आहे. तिला आपल्या मित्रांची आणि आसपासच्या लोकांची खूप काळजी असते. कुणाचं काही बिनसलं समजलं, तर ती स्वतःहून चौकशी करते. तिचं हे गुण मला खूप आवडतात,” असं कौतुकपूर्वक तो म्हणाला.या candid खुलाशामुळे ओंकार आणि प्राजक्ताच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता निर्माण झाली असून, त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफस्क्रीन मैत्री या दोन्ही गोष्टींवर सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
हेही वाचा :
प्रसिद्ध वकीलावर मोठी कारवाई; वकिलीची सनद रद्द
५ ते ८ नोव्हेंबरदरम्यान उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांची संवाद…
‘गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीशी अफेअर…’