केंद्र सरकारने(government) देशातील सर्व नागरिकांसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणे अनिवार्य केलं आहे. या प्रक्रियेची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. या मुदतीत जर पॅन आणि आधार एकमेकांशी जोडले गेले नाहीत, तर 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाली आहे.

TaxBuddy या करसल्लागार प्लॅटफॉर्मनुसार, पॅन निष्क्रिय झाल्यानंतर आयकर रिटर्न दाखल करणे शक्य होणार नाही, तसेच SIP, गुंतवणूक, किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. त्याचबरोबर Form 26AS, TDS/TCS माहिती आणि कर परतावा पाहता येणार नाही. त्यामुळे वेळेत पॅन-आधार लिंक करणं अत्यंत आवश्यक आहे.
प्राप्तिकर विभागाच्या ई-फाइलिंग पोर्टलवर (www.incometax.gov.in) ही प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने करता येते. वापरकर्त्यांना आपल्या पॅन आणि आधार क्रमांकासह लॉगिन करून ‘Link Aadhaar’ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. काही सेकंदांतच ही प्रक्रिया पूर्ण होते.
सरकारकडून(government) नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत की, अंतिम मुदत जवळ येण्याची वाट न पाहता वेळीच पॅन-आधार लिंक करावं, अन्यथा पुढील काळात बँक व्यवहार, कर भरणा आणि गुंतवणुकीसंदर्भात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

हेही वाचा :
प्रियकर सोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला
सकाळचा नाश्ता खरंच इतका महत्त्वाचा आहे का? जाणून घ्या सत्य!
लाडक्या बहिणींच्या हाती फक्त 12 दिवस, अन्यथा…