उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एक दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. चुनार रेल्वे स्थानकावर रेल्वेने धडक दिल्याने चार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर चोपन-प्रयागराज पॅसेंजर ट्रेनमधून उतरले होते. स्टेशनवर, प्रवाशांनी घाईघाईने रेल्वे रुळ ओलांडण्याचा(crossing) प्रयत्न केला तेव्हा विरुद्ध दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनने (हावडा-कालका नेताजी एक्सप्रेस) त्यांना धडक दिली.

रेल्वे रुळ ओलांडताना ही भीषण दुर्घटना घडली. ट्रेनने धडक दिल्याने भाविकांचा जागीच मृत्यू झाला. सर्व भाविक गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. या घटनेनंतर चुनार रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केलं होतं. प्रशासनाने प्रवाशांना(crossing) यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रवाशांना सुरक्षिततेसाठी प्लॅटफॉर्म आणि ओव्हरब्रिजचा वापर करण्याचे आवाहन केलं आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, धडक इतकी भीषण होती की मृतदेहांचे तुकडे झाले होते. दुर्घटनेनंतर स्थानकावर आरडाओरड सुरु झाली. जीआरपी आणि आरपीएफ पथकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेलं. मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी भेट देत आहेत.

हेही वाचा :
निवडणुका जाहीर झाल्यानंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…
पत्नीकडून वीट-दांडक्याने निर्घृण खून; मृतदेहाशेजारी बसून केला मेकअप
Apple Watch झाली आणखी स्मार्ट! WhatsApp चॅटिंग करण्यासाठी iPhone ची आवश्यकता संपली