इंडियन प्रिमिअर लीगच्या 18 व्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 च्या जेतेपदावर नाव कोरणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आळा आहे. 2026 च्या हंगामापूर्वी संघाच्या मालकीमध्ये मोठा फेरबदल होणार आहे. संघाची मूळ मालकी असलेल्या फ्रँचायझीने जाहीर केले आहे की ते आरसीबीच्या संघांसाठी 31 मार्च 2026 पूर्वी नवीन मालक शोधणार आहे. यामुळे आरसीबी संघ विकला (sale)जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. आरसीबीची मालकी असलेली कंपनी डियाजियो पीएलसीने संघ विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. विक्री पूर्ण करण्यासाठी कंपनीने 31 मार्चची अंतिम मुदत निश्चित केली आहे.

आरसीबी विकून, डियाजियो भारतातील त्याच्या दारू व्यवसायावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. एकाच उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याच्या दुरोगामी नियोजनाच्या दृष्टीनेच मूळ कंपनी आरसीबीचा आयपीएल संघ विकत आहे. वृत्तानुसार, डियाजियोने आरसीबी आणि त्याच्या डब्ल्यूपीएल संघाला विकण्याचा (sale)आपला हेतू मुंबई स्टॉक एक्सचेंजला सूचित केला आहे. डियाजियो ही एक ब्रिटिश मूळ असलेली अल्कोहोलिक ब्रुअरी कंपनी आहे. या कंपनीकडेच रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची मालकी आहे. डियाजियो भारतात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड द्वारे कार्यरत आहे.

डियाजियोने आरसीबीच्या विक्रीबाबत एक निवेदन देखील जारी केले आहे. डियाजियोने सांगितले की, “युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड त्यांच्या उपकंपनीतील गुंतवणुकीचा आढावा घेत आहे. या पुनरावलोकनात आयपीएलमधील मालकी असलेल्या संघाचा समावेश आहे. हा संघ विकण्याचा बोर्डाने निर्णय घेतला आहे..”आरसीबी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू या संघाकडून खेळतो. यामुळेच संघाची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड मोठी आहे. आरसीबी याच हंगामात, आयपीएल 2025 मध्ये चॅम्पियन बनला. गुंतवणूक फर्म होलिहान लोकी यांच्या मते, आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू सध्या अंदाजे 270 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स किंवा अंदाजे 2300 कोटी रुपये इतकी आहे. म्हणून, जर आरसीबी विकला गेला तर तो आयपीएलच्या इतिहासातील एक विक्रमी करार ठरणार आहे.

विराट कोहली हा आयपीएलमधील असा एकमेव खेळाडू आहे जो मागील 18 वर्षांपासून एकाच संघाकडून खेळतोय. मागील 18 वर्षांमध्ये अनेकदा आयपीएलच्या चषकाने हुलकावणी दिल्यानंतर यंदाच्या वर्षी पहिल्यांदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाला जेतेपदावर नाव कोरता आल्याने आता या करंट चॅम्पियन संघाला कोण विकत घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्याला नवे नेतृत्व — सुरेश हाळवणकर यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती

आज गुरुवारचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा…

TATA कडून Team India च्या जगज्जेत्यांना खास भेट

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *