इस्लामपूरमधील रसिका मल्लेश कदम (वय 35, रा. बहे नाका) या विवाहितेचा(Married) घातपात करून कृष्णा नदीत फेकल्याचा प्रकरण समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी बोरगाव (ता. वाळवा) येथील संशयित युवक स्वतःहून इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि आपली गुन्हा कबूल केला. पोलिसांनी तसेच सांगली येथील आयुष हेल्पलाईन पथक यांचा समावेश करून नदीत शोधमोहीम राबविली. रात्री उशिरा रसिकाची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात यश आले, तर गुरुवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, रसिका बहे नाका परिसरात कुटुंबासह राहात होत्या. त्यांना दोन मुले आहेत, तर पती मल्लेश कामानिमित्त कर्नाटकात असतात. इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात काम करताना रसिकाची ओळख बोरगाव येथील संशयित युवकाशी झाली होती आणि दोघे नियमित भेटत होते.मंगळवारी सायंकाळी रसिका (Married)दुचाकीने बोरगाव येथील युवकाकडे गेल्या असता पैशाच्या देवघेवीवरून वाद झाला. संशयिताने रसिकाला मारहाण करून पुलावर नेऊन नदीत फेकले, तसेच त्यांची दुचाकी नदीत फेकली. दुसऱ्या दिवशी बुधवारी युवकाने पोलिस ठाण्यात हजर होऊन आपला गुन्हा कबूल केला.
पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताकारी येथील नदीपात्राकडे धाव घेतली, तसेच घटनास्थळी सांगली येथील आयुष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले.

हेही वाचा :
डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…
…तर प्रत्येक महिलेच्या खात्यावर 30 हजार रुपये होणार जमा
लिफ्टमध्येच केली सू सू अन् पुढे जे घडलं, Video Viral