बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कैक गुन्हेगारी आणि त्या धर्तीवरील घटना घडल्या असून हा भाग कैक कारणांनी लक्ष वेधत असतानाच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं. बीड नगरपरिषद इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्यानं (Employee)आयुष्य संपवलं असून, गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली. मृताचे नाव अविनाश धांडे (वय अंदाजे 40 वर्षे) असे असून, ते नगरपरिषदेच्या वसुली विभागात कार्यरत असल्याचं सांगण्यात येत आहे.

शनिवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे नगरपरिषदेतील स्वच्छता कर्मचारी कामावर आले. तिथं ते इमारतीच्या वरच्या मजल्यावर गेले असता एका शिडीला कोण व्यक्ती गळफास(Employee) घेतल्याचं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी त्वरित ही माहिती वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांना दिली. ज्यानंतर बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला.

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. मात्र आत्महत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अविनाश धांडे हे गेल्या काही वर्षांपासून वसुली विभागात चांगलं काम करत होते. त्यांच्या अकस्मात मृत्यूने सहकाऱ्यांमध्येही शोककळा पसरली आहे.

नगरपरिषदेच्या इमारतीतच असा प्रकार घडल्याने प्रशासनातही मोठी खळबळ माजली आहे. ज्यामुळं सदर घटनेचा सखोल तपास बीड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, धांडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील तसेच कामाशी संबंधित बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडे या घटनेचा तपास जलद गतीने करण्याची मागणी केली असून, धांडे यांच्या आत्महत्येचं कारण समजून घेण्यासाठी प्रशासनाने गंभीरपणे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्रावर नव्या संकटाची चाहूल! पुढचे २४ तास अतिमहत्त्वाचे!

22 कॅरेट सोन्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक रव्याचा चिल्ला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *