वॉशिंग्टन / नवी दिल्ली | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली असून, मोदींनी त्यांना भारतात येण्याचे आमंत्रण दिले(purchases) आहे. “मी भारतात येऊन प्रत्यक्ष बसून चर्चा करेन आणि यावर मार्ग काढू,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प पुढील वर्षाच्या सुरूवातीला भारताच्या दौऱ्यावर येऊ शकतात. दरम्यान, अमेरिकेने भारतावर लावलेल्या उच्च टॅरिफमुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.अमेरिका भारतावर सुरुवातीपासूनच दबाव आणत आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी(purchases) थांबवावी. त्याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी केलेले विधान खळबळजनक ठरले आहे. त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाकडून तेल खरेदी जवळजवळ बंदच केली आहे.”

ट्रम्प यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि आर्थिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण, आतापर्यंत भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवली होती. मात्र अलीकडील काही अहवालांनुसार भारताने तेल आयात कमी केली असल्याचे दिसत आहे.भारतातील दोन मोठ्या रिफायनरी कंपन्यांनी अलीकडेच रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी अमेरिकेने रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे रशियातून भारतात येणाऱ्या तेल निर्यातीवर परिणाम झाला आहे.

ट्रम्प यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले, “ते (मोदी) माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेन आणि मी भारतात जाईन.”सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चा सुरू असून, उच्च टॅरिफ आणि तेल खरेदीवरील अमेरिकेच्या भूमिकेमुळे भारतावर आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांचे मत आहे की, या भेटीत दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापार धोरणांवर निर्णायक चर्चा होऊ शकते.

हेही वाचा :

मटकी खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

जगावर मोठं संकट! आता भयंकर युद्ध होणार

दमदार बुलेट, 650cc इंजिन, किंमत, फीचर्स जाणून घ्या

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *