पाकिस्तान(Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये सीमेजवळ संघर्ष झाला होता, ज्यात दोन्ही बाजूचे सैनिक मारले गेले. त्यानंतर शांततेसाठी आणि व्यापार, इतर बाबी सुरळीत होण्यासाठी इस्तानबूल येथे दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी लवकरच होणार आहे.

तथापि, चर्चेच्या आधीच पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी अफगाणिस्तानला थेट धमकी दिल्याने चिंता वाढली आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी फक्त दोन शब्दांत उत्तर दिले – “युद्ध होणार?” – आणि अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांना आसरा देण्याचा आरोप केला. पाकिस्तानने तहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेवर अफगाणिस्तानचे समर्थन असल्याचा आरोप करत आले आहे, तर अफगाणिस्तानकडून असा विश्वास व्यक्त केला जातो की पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या जमिनीचा वापर होत नाही.

2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्ता मिळाल्यापासून दोन्ही देशांमध्ये दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये वाढ दिसून येत आहे. पाकिस्तान(Pakistan)-अफगाणिस्तान यांच्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीनंतर युद्धविराम कायम ठेवण्याचे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आले होते.आता होणाऱ्या इस्तानबूलमधील बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी शांतता आणि व्यापारवाढीसंबंधी चर्चासत्र राबवले जाईल. मात्र ख्वाजा आसीफच्या धमकीमुळे या चर्चेवर काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चर्चेची दुसरी फेरी ही दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्यासाठी आणि सीमा सुरक्षेसंबंधी धोरण ठरवण्यासाठी निर्णायक ठरू शकते.

हेही वाचा :

दमदार बुलेट, 650cc इंजिन, किंमत, फीचर्स जाणून घ्या

मतदान करण्यासाठी उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral

CNG भरताना आपल्याला ड्रायव्हर कारमधून का उतरवतो?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *