कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:

नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटाचातपास(Operation) आता एन आय ए कडे सोपवण्यात आला असून सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली तपास करणाऱ्या पथकाने डॉक्टर शाहीन सईद या डॉक्टर महिलेसह तपासाच्या रडारवरअसलेल्या चार डॉक्टर्सना रीतसर अटक केली आहे. संशयीत आरोपींची संख्या आणखी ही वाढण्याची शक्यता आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात दहशतवाद्यांचा चेहरा असलेल्यांच्या मुस्क्या आवडल्या गेल्या आहेत. डॉक्टर आदिल राथेर, डॉक्टर मुजमिल गणाई, डॉक्टर उमर मोहम्मद अशी इतर दहशतवाद्यांची नावे आहेत. या सर्वांचा या दहशतवादी घटनेत प्रत्यक्ष सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ला परिसरात एका कार मध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या गुन्ह्याची मोडस ऑपरंडी पाहता हा दहशतवाद्यांनीच केलेला हल्ला असल्याचे घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात निष्पन्न झाले होते.

तपासाचा एकूण वेग पाहता काही दिवसातच या घटनेत सहभागी असलेल्या सर्वांना कम पुराव्यासह अटक केली जाईल यात शंका नाही.ज्यांच्याकडे तपासाची सूत्रे आहेत ते सुदानंद दाते हे महाराष्ट्राचे असून त्यांना 2008 मध्ये झालेल्या मुंबईवरील 26 /11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे.नवी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात सोमवारीएका कारच्या माध्यमातून करण्यात आलेला शक्तिशालीस्फोट(Operation) हा दहशतवादी हल्लाअसून तो “जैश ए मोहम्मद”कडून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या 32 वर्षात दहशतवादी संघटनांनी केलेला हा पंधरावा मोठा हल्ला आहे. एप्रिल महिन्यात काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे झालेल्या सर्वात भीषण हल्ल्यानंतरझालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला असूनतो आत्मघातकी हल्ला असल्याचे समोर आले आहे.नवी दिल्लीतील लाल किल्ला हा ऐतिहासिक परिसर आहे. पर्यटक मोठ्या संख्येने तेथे येत असतात.सायंकाळी हा परिसर गजबजलेला असतो.

मेट्रो स्टेशनच्या गेटच्या परिसरात आय ट्वेंटी या कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला आणि त्यामध्ये आठ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 25 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने या परिसरात रोज भरणाऱ्या बाजाराला सोमवारी साप्ताहिक सुट्टी होती. त्यामुळे मोठी जीवित हानी टळली. काही महिन्यापूर्वी पाकिस्तानच्या विविध भागात घुसून भारतीय लष्करानेसर्जिकल स्ट्राइक केला होता आणि त्यामध्ये दहशतवादी संघटनांचे अनेक तळ उध्वस्त करून टाकण्यात आले होते.100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते. तुम्ही केलेल्या हल्ल्यामुळे आम्ही हतबल झालेलो नाही. पुन्हा आम्ही दहशतवादी हल्ले करून भारतामध्ये घबराटीचे वातावरण तयार करू शकतो असा संदेश देण्यासाठी म्हणून जैशने हा हल्ला केला असावा. पण अजून तरी या हल्ल्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली नाही.पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंबलीचे अधिवेशन सध्या राजधानी इस्लामाबाद येथे सुरू आहे.

लष्कर प्रमुख आणि आय एस आय यांचे महत्त्व वाढवण्यासाठी घटनादुरुस्ती केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत हा हल्ला झालेला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी तपास यंत्रणांनी काही ठिकाणी छापे टाकून स्लीपर सेल मध्ये सक्रिय असलेल्या तिघा जणांना अटक केली असून हे सर्व जैश साठी काम करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते.त्यानंतर नवी दिल्लीत हा धडाका झाला आहे. या हल्ला प्रकरणी तपास यंत्रणांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. नवी दिल्लीत झालेल्या या हल्ल्याची पद्धत पाहताती आत्मघातकी पथकाशीसाम्य दाखवते.स्फोटासाठी वापरलेली कार ही हरियाणा पासिंगची आहे. तिच्या मूळ मालकाला ताब्यात घेतले आहे. दहशतवादी संघटना भारतीय लष्कराने मोठा दणका दिला असतानाही त्यांच्या कारवाया इथे होत असतात किंवा होत आहेत याचा अर्थ स्थानिक लोक त्यांना सामील आहेत असा होतो. दहशतवाद्यांचे स्लीपर सेल भारतात अनेक ठिकाणी सक्रिय आहेत हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. नवी दिल्लीत स्फोट होण्यापूर्वी गुजरात पोलिसांनी काही संशययिताना पकडले आहे.

भारतीय तपास यंत्रणा या हल्ल्यामागील मास्टरमाईंडचा शोध घेतील यात शंका नाही. घटनास्थळावरून पोलिसांनापुरावे सापडतील. स्फोटा साठी कोणती स्फोटके वापरली हेही तपासातून निष्पन्न होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी हेभुतांनच्या दौऱ्यावर आहेत. तेथून आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी”ज्यांनी हा स्फोट घडवला आहे त्यांना सोडणार नाही”असा इशारा दिला आहे.सर्व प्रकारच्या शक्यता गृहीत धरून या प्रकरणाचा आम्ही तपास करत आहोत. आत्ताच काही नेमकेपणाने याबद्दल सांगता येणार नाही पण लवकरच जनतेला आम्हीयाप्रकरणी जे काही स्पष्ट झाले आहे ते सांगू असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.स्लीपर सेल हे दहशतवादी संघटनांचे मुख्य भांडवल असते. स्लीपर सेलचे जाळे उद्ध्वस्त करण्याकडे तपासयंत्रणांचाप्रयत्न असतो. पण हे काम अगदी सहज आणि सोपे ही नसते. तपास यंत्रणांना त्यासाठी कायम अलर्ट मोडवर राहावे लागते. स्लीपर सेलच नसेल तर दहशतवादी संघटनांना कारवाया करण्यात मोठा अडथळा येत असतो. इतकेच नव्हे तर असे हल्ले करण्याचे धाडसी त्यांच्याकडून होत नसते.

आणि म्हणूनच आपल्या परिसरात कोणी अशी व्यक्ती संशयास्पद स्थितीत वावरताना दिसत असेल किंवा तिच्याकडून काहीतरी घडण्याची शक्यता आहे असे दिसत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून त्याची माहिती दिली पाहिजे.संबंधित संशयास्पद कारमध्ये काही जण होते अशी माहिती पुढे आली आहे. या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि त्या सर्व मृतदेहांवर हक्क सांगण्यासाठी संबंधितांच्या नातेवाईकांना यावे लागेल.ज्यांच्या मृतदेहावर हक्क सांगण्यासाठी कोणी येणार नाही ते मृतदेह संशयितांचे असतील असे स्पष्ट होईल.एकूणच हे प्रकरण केंद्र शासनाने अतिशय गांभीर्याने घेतलेले आहे आणि त्याचे प्रत्यक्ष परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील.

हेही वाचा :

सांगलीत दलित महासंघाच्या कार्यकर्त्याचा खून…

दिल्लीतील स्फोटाचे धक्कादायक कनेक्शन उघड; थेट ‘या’ विद्यापीठाशी संबंध

शेअर बाजारात आज करा या स्टॉक्सची खरेदी, पैशांचा पाऊस पडेल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *