प्रेमानंद महाराज यांचा प्रचंड मोठा भक्त परिवार आहे,(devotees) देशभरातच नाही तर जगभरात त्यांचे भक्त आहेत. प्रेमानंद महाराज प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या भक्तांना अध्यात्माचा मार्ग दाखवतात, तसेच ते आपल्या भक्ताच्या प्रत्येक शंकेचं निरसन देखील करतात.प्रेमानंद महाराज हे एक प्रसिद्ध संत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, प्रेमानंद महाराज यांची एकूण संपत्ती किती आणि त्यांचं शिक्षण किती झालं आहे.
प्रेमानंद महाराज किती शिकले?प्रेमानंद महाराज यांचं नाव अनिरुद्ध कुमार पांडे आहे. त्यांचा जन्म 1969 मध्ये कानपूर जिल्ह्यातल्या सरसौल तालुक्यातील अखरी या छोट्याशा गावात झाला.(devotees) प्रेमानंद महाराज यांनी आपलं प्राथमिक शिक्षण अखरी या गावातच पूर्ण केलं. मात्र पाचवीनंतर त्यांना अध्यात्माची ओढ लागली, त्यानंतर ते 9 वी पर्यंत शिकले, त्यानंतर त्यांनी घर संसाराचा त्याग केला, शाळाही सोडली आणि अध्यात्माचा मार्ग स्विकारला. आज जगभरात प्रेमानंद महाराज यांचे भक्त आहेत.

प्रेमानंद महाराजांची संपत्ती किती?प्रेमानंद महाराज यांच्याकडे किती संपत्ती असावी? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सकता असते, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. प्रेमानंद महाराज यांना एका भक्ताने प्रश्न विचारला होता की महाराज तुमच्याकडे संपत्ती किती आहे, (devotees) या प्रश्नाला उत्तर देताना प्रेमानंद महाराज यांनी सांगितलं की, माझ्याकडे माझ्या मालकिची कोणतीच संपत्ती नाहीये. रिपोर्ट देखील हेच सांगतो की प्रेमानंद महाराज यांच्याकडे चल-अचल अशी कोणतीच संपत्ती नाहीये, एवढंच काय अजून त्यांचं बँकेमध्ये देखील खातं नाहीये.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रेमानंद महाराज यांच्याकडे त्यांचं स्वत:च्या मालकीचं घर देखील नाहीये, ते आपल्या एका भक्ताच्या फ्लॅटमध्ये राहतात, त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च आणि इतर सर्व खर्च त्यांचे भक्तच करतात. प्रेमानंद महाराज यांच्याकडे कार देखील नाहीये.ते सरळ साधं आणि अध्यात्मिक जीवन जगतात. प्रेमानंद महाराज आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून आपल्या भक्तांना अध्यात्माचा मार्ग सांगतात, भक्तांच्या शकांचं निरसन करतानाच त्यावर ते उपाय देखील सांगतात.