आजच्या डिजिटल युगात मोबाईलशिवाय(Mobile) आयुष्याची कल्पनाही करता येत नाही. संवाद, व्यवहार, खरेदी-विक्री, बँकिंगपासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक गोष्ट मोबाईलवर अवलंबून झाली आहे. त्यामुळे मोबाईल हे केवळ साधन नसून आता जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पण याच मोबाईल वापराच्या सवयीमुळे तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल! कारण सध्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगार अत्याधुनिक मार्गांनी लोकांना फसवत आहेत. विशेष म्हणजे आता व्हॉट्सॲपवर सुरू झालेला “मिशो गिफ्ट स्कॅम” देशभरात वेगाने पसरत आहे.

या स्कॅममध्ये “Meesho Gift” या नावाने एक लिंक मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. त्या लिंकसोबत असा मेसेज येतो की — “ही लिंक 20 जणांना शेअर करा आणि तुम्हाला फ्री गिफ्ट मिळेल.” लोभाला बळी पडून अनेकजण ती लिंक पुढे पाठवतात किंवा त्यावर क्लिक करतात. पण प्रत्यक्षात या लिंकद्वारे तुमचा मोबाईल(Mobile) डेटा आणि वैयक्तिक माहिती हॅक केली जाते.सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या फसवणुकीत वापरकर्त्यांना “Meesho कंपनीतून बोलत आहोत” असे सांगून OTP मागवले जाते. OTP दिल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून पैसे गायब होतात. अशा प्रकारे देशभरातील अनेक लोक आर्थिक फसवणुकीचे बळी ठरत आहेत.
केवळ “मिशो गिफ्ट स्कॅम”च नव्हे तर “इंडिया पोस्ट अनुदान योजना”, “एसबीआय लाभ योजना” किंवा “सरकारी मदत योजना” अशा नावानेही बनावट लिंक शेअर होत आहेत. या सर्व लिंक फसवणुकीचा भाग असून नागरिकांना आर्थिक तसेच वैयक्तिक तोटा सहन करावा लागतो. सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणतीही संशयास्पद लिंक किंवा मेसेज मिळाल्यास त्यावर क्लिक करू नये. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नये आणि आर्थिक माहिती, OTP किंवा बँक तपशील कधीही कोणालाही सांगू नये. डिजिटल युगात सुरक्षित राहायचे असेल, तर सतर्कता हीच सर्वात मोठी सुरक्षा आहे.

हेही वाचा :
दिल्ली “10/11′ चा हल्ला तपास ऑपरेशन””डॉक्टर””
रिझर्व बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांसाठी ‘हे’ नवीन नियम लागू होणार
सांगलीत दलित महासंघाच्या कार्यकर्त्याचा खून…