महाराष्ट्र (Maharashtra)राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. 2026 च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नियमित विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आतापर्यंत अर्ज भरू शकले नाहीत, त्यांना आता एक शेवटची संधी मिळाली आहे.

बोर्डाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांचे अर्ज त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत ऑनलाईन पद्धतीने भरले जाणे आवश्यक आहे. सर्व माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी UDISE+ प्रणालीतील PEN-ID माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे.पुनर्परिक्षार्थी, खाजगी उमेदवार, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच ITI ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे मात्र प्रचलित पद्धतीने भरायची आहेत. हे अर्ज देखील विलंब शुल्कासह भरता येणार आहेत.

सर्व शाळांनी अर्ज शुल्क भरण्यासाठी ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये RTGS/NEFT द्वारे रक्कम जमा करावी. कोणत्याही परिस्थितीत मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.रक्कम भरल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या अर्जाचा “Payment Status” आणि “Send to Board” स्थिती (Maharashtra)तपासणे शाळांना आवश्यक आहे. फक्त “Paid” आणि “Send to Board” अशी स्थिती असलेली आवेदनपत्रेच मंडळाकडे वैध मानली जाणार आहेत.बोर्डाने स्पष्ट केलं आहे की हीच अंतिम मुदत असेल आणि त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि शाळांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदेंकडून आनंदाची बातमी…
भारताला भविष्यात कोणता धोका? रघुराम राजन यांचा इशारा…
कारला लागलेल्या आगीत 5 महिन्यांची गर्भवती जागीच ठार…



By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *