सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित चित्रपट ‘कुली’ चित्रपटगृहांमध्ये (superstar) दाखल होताच ऑनलाइन पायरसीचा शिकार झाला आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या उच्च-गुणवत्तेच्या आणि कमी-रिझोल्यूशनच्या प्रती काही तासांतच बेकायदेशीर वेबसाइट्स आणि टेलिग्राम ग्रुप्सवर लीक झाल्या आहेत. यामुळे चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पायरसी वेबसाइट्सवर ‘कुली’चा धुमाकूळ ‘कुली फ्री डाउनलोड’ हे शब्द सोशल मीडिया आणि सर्च इंजिनवर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत. Tamilrockers, Filmyzilla, Movierulez आणि Moviesda सारख्या कुप्रसिद्ध पायरसी वेबसाइट्सवर 1080p HD पासून 240p पर्यंतच्या वेगवेगळ्या व्हर्जनमध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे. यामुळे चित्रपटप्रेमींना चित्रपटगृहांऐवजी घरी बसून विनामूल्य पाहण्याचा मोह होत आहे, जे चित्रपटसृष्टीसाठी एक गंभीर आव्हान आहे.(superstar) या पायरसीमुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज आणि संपूर्ण टीमने प्रेक्षकांना केवळ चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांच्या कष्टाला योग्य तो न्याय मिळेल.

रजनीकांतचा ‘कुली’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया, म्हणाले ‘उपेंद्र-नागार्जुनने केला धमाका…’ चित्रपटाबद्दल खास माहिती लोकेश कनगराज दिग्दर्शित ‘कुली’ चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत नागार्जुन, आमिर खान आणि श्रुती हासन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथा देवा नावाच्या एका माजी सोन्याच्या तस्करावर आधारित आहे, जो जुन्या सोन्याच्या घड्याळांमध्ये लपवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली हरवलेली ताकद पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो. “जर रजनीकांत परिपूर्ण नायक असतील, तर नागार्जुन या चित्रपटाचे परिपूर्ण खलनायक आहेत. (superstar) चित्रपटाच्या कथेला नागार्जुन यांनी त्यांच्या अभिनयाने योग्य आधार दिला आहे.”

ऑनलाइन पायरसीचा धोका चित्रपटाची बेकायदेशीर प्रत डाउनलोड करणे किंवा पाहणे हा भारतीय कायद्यानुसार गुन्हा आहे. कॉपीराइट कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी ₹२ लाख पर्यंत दंड आणि तुरुंगवासही होऊ शकतो. याशिवाय, पायरसी वेबसाइट्सवर मालवेअर, स्पायवेअर आणि फिशिंग लिंक्सचा धोका असतो, ज्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते किंवा आर्थिक फसवणूक होऊ शकते. पायरसी केवळ बॉक्स ऑफिसच्या कमाईलाच नाही तर चित्रपट निर्मितीच्या संपूर्ण प्रक्रियेला नुकसान पोहोचवते. त्यामुळे, प्रेक्षकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, हे कलाकारांच्या आणि तंत्रज्ञांच्या कामाला पाठिंबा देण्यासारखं आहे.
रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ ! चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी काय म्हटले? आता, चित्रपट पाहिल्यानंतर, प्रेक्षक एक्स अकाउंटवर त्यांच्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘कुली द पॉवर हाऊस, रजनीकांतची शानदार एन्ट्रीने चमत्कार केला. नागार्जुन अक्किनेनी देखील धमाका केला आहे.’
दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘पहिला भाग खूप उत्साही वाटला. नागार्जुनचा अंदाज देखील खतरनाक आहे. श्रुती हासननेही उत्तम अभिनय केला आहे. चित्रपट पाहताना खूप मजा आली.’ तिसऱ्या युजरने लिहिले, ‘पहिला भाग चांगला आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या पडद्यावरच्या उपस्थितीने मने जिंकली. सिनेमागृहात चित्रपटाची खूप चर्चा रंगली.’
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या