होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील वहिनींची मनं जिकणारे (minister)आदेश बांदेकर यांची एक वेगळी ओळख आहे. महाराष्ट्रातील लाखो वहिनींचे ते लाकडे भाऊजी बनले आहेत. आज देखील अनेक जण त्याचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम मिस करत असतात. परंतु आता चिंता करण्याचं कारण नाही, कारण आदेश बांदेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यंदा पैठणीचा खेळ रंगणार नसून यंदा वेगळाच खेळ पहायला मिळणार आहे. श्रावण महिना सुरु झाला की, सणांची रेलचेल सुरु होते. या महिन्यात महिलांना आवडणारा सण म्हणजे मंगळगौरीचा सण. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या मालिकांमध्ये मंगळागौरीच्या सणाचा जल्लोष पहायला मिळतोय.(minister) दरम्यान लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेत मंगळागौरीचा सण विशेष ठरणार आहे. कारण या मंगळगौरी स्पर्धेत विशेष आकर्षण ठरणार आहेत ते अभिनेते आदेश बांदेकर.

कोल्हापुरातील सर्वांत मोठ्या मंगळागौरी स्पर्धेत आयोजन हे आदेश बांदेकर करणार आहे. तसंच यामध्ये सासु-सुनेची जोडी देखील पहायला मिळणार आहे.(minister) त्यामुळे कला आणि सरोज सोबत नयना -रोहिणी, रजनी आणि अनामिका देखील पहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात सुत्रसंचलन हे आदेश बांदेकर करणार आहे. त्यामुळे लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा पुढचा भाग पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांचा बुधगावात मेळावा; राजू शेट्टी, सतेज पाटील राहणार उपस्थित
“130 किमी रेंजसह दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; फक्त ₹81,000 मध्ये विक्रीला
जगातील सर्वात भयानक शापित गाव, इथे जाताच लोकांच्या बनतात बाहुल्या