उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या गटादरम्यान शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असलेल्या वादात नवीन तारीख पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 21 जानेवारी रोजी या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी होईल असं गुरुवारी स्पष्ट केलं. पुन्हा एकदा नवीन तारीख देण्यात आल्याने लवकरात लवकर निर्णय देण्याची मागणी करणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेनं (Election)नाराजी व्यक्त केली. मात्र एकीकडे हे प्रकरण पुढे गेलेलं असतानाच दुसरीकडे शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. शिवसेनेच्या पक्षचिन्हावरुन वाद सुरु असतानाच शरद पवारांना पक्षचिन्हावरुन मोठा दिलासा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत (Election)तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला साधर्म्य नाव असणाऱ्या पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे फटका बसला होता. पिपाणी हे चिन्ह गोठविण्याची मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येत होती. अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह वगळले आहे.
पिपाणी या चिन्हाला निवडणूक चिन्हांच्या यादीत ‘तुतारी’ नाव होते. या नामसाधर्म्यामुळे शरद पवार गटाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाल्याचा दावा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून करण्यात आला होता. त्यामुळे निवडणूक आयोगाला तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र आयोगाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही मागणी मान्य करण्यात आली. आयोगाने आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
हा शरद पवारांच्या पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ मानला जात आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वापरता येणार नाहीये. त्यामुळे यापूर्वी शरद पवारांच्या पक्षाने केलेल्या दाव्याप्रमाणे त्यांना जसा या चिन्ह साधर्म्यामुळे फटका बसला तसा कोणताही प्रकार आता होणार नाही.
पिपाणी (ट्रम्पेट) चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. या चिन्हाच्या गोंधळामुळे मतदारांनी चुकीच्या चिन्हावर (पिपाणी) मतदान केले, ज्यामुळे पक्षाच्या तुतारी चिन्हाला मतांचे विभाजन झाले आणि एकूण 9 जागांवर उमेदवार पराभूत झाल्याचं आकडेवारी दाखवत सांगण्यात आलं. या जागांवर पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवारांना मिळालेली मते पराभवाच्या फरकापेक्षा जास्त होती, ज्यामुळे पक्षाला हानी पोहोचली.

हेही वाचा :
वाहनधारकांनो HSRP नंबर प्लेट संदर्भात अंतिम मुदत वाढवली
बँकेचा नवा नियम! ‘या’ सेवेसाठी लागणार अतिरिक्त शुल्क
१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा Cheese Garlic Bread