साप(Snakes) हा जंगलातील सर्वात विषारी प्राणी म्हणून ओळखला जातो. किंग कोब्राही त्याच्याच जातीचा… ज्याला पाहूनच अंगाचा थरकाप उडतो अशा किंग कोब्रासोबत काकांनी असं काही करून दाखवलं की पाहून सर्वांनाच धक्का बसला. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असताना या व्हिडिओने मात्र सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला एक काका किंग कोब्राला हातात घेऊन त्याच्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसतील. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक किंग कोब्रा(Snakes) बसल्याचे दिसते. त्याला पकडण्यासाठी काका हातात एक पिशवी घेऊन येतात. ते कोब्राला पकडायला जातात खरं पण तितक्यातच कोब्रा आपला फणा पसरवून काकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यांनतर पुढे असं काही घडत ज्याचा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात काका कोब्राला पुढच्याच क्षणी किस करताना दिसून येतात.

हे कोब्राला हातात घेतात आणि त्याचे तोंड थेट आपल्या तोंडात टाकतात. हे दृश्य युजर्ससाठीच नाही तर प्रत्यक्षदर्शींसाठीही धक्कादायक असते. त्याच्या चेहऱ्यावर यावेळी कोणतीही भीती नसते. व्हिडिओच्या शेवटी ते सापाला पकडून पिशवीत भरताना दिसून येतात. हा सर्वच प्रकार आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून लोकांनी यावर आपल्या मजेदार प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.

कोब्रा किसिंगचा हा व्हिडिओ @Digital_khan01 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “यमराज स्वतः सदम्यात आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे धोकादायक ठरू शकते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “या सापाने तर संपूर्ण साप समाजाला बदनाम केलं”.

हेही वाचा :

“माझे अश्लील फोटो पाहून माझा मुलगा…”, गिरिजा ओक ‘त्या’ फोटोंवरून संतापली

पीएम मोदी 11 कोटी शेतकऱ्यांना गिफ्ट देणार, या दिवशी बँक खात्यात जमा होईल पैसा

मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *