मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि बहुगुणी अभिनेत्री(actress) गिरीजा ओक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या साडीतील सोज्वळ लुकचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, एका मुलाखतीत तिनं केलेल्या धक्कादायक खुलासानं सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. केवळ अभिनयाने नव्हे, तर व्यक्तिशः अनुभव शेअर करण्याच्या प्रामाणिकपणामुळेही ती सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

लल्लनटॉपला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत गिरीजाने तिच्या मुंबई लोकल प्रवासातील एक अप्रिय आणि त्रासदायक प्रसंग उघड केला. त्या काळात ती दैनंदिन कामांसाठी आणि शूटिंगसाठी लोकल ट्रेनचा नियमित वापर करायची. लोकलमधील धावपळ, गर्दी आणि गोंधळ या सगळ्याशी गिरीजा (actress)चांगलीच परिचित होती. पण एक घटना मात्र तिला आयुष्यभर विसरता आली नाही. गिरीजा म्हणाली ‘मी नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने प्रवास करत होते. गर्दी होती, पण सगळं नेहमीसारखंच वाटत होतं. अचानक पाठीमागून एक मुलगा आला. मला त्याची चाहूलही लागली नाही. सेकंदाच्या आत त्याने माझ्या पाठीवर मानेपासून कंबरेपर्यंत अंगावर शहारे आणणारा बोटांचा स्पर्श करून गेला.’
ती पुढे म्हणाली ‘जसा आला तसाच तो चटकन उलटा फिरला आणि गर्दीत विरून गेला. त्याचा चेहरा देखील मला दिसला नाही. हा स्पर्श अपघाती नव्हता, तर मुद्दाम केलेली घृणास्पद कृती होती, हे स्पष्ट जाणवत होतं.’गिरीजाने नेमकेपणाने सांगितले की, मुंबईत लोकल ट्रेन हे शहराचं हृदय असून लाखो लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेत. गर्दीत धक्काबुक्की होणं, चुकून स्पर्श होणं सामान्य मानलं जातं. पण त्याच गर्दीचा फायदा घेऊन काहीजण महिलांवर अशा स्वरूपाचे अत्यंत गलिच्छ प्रकार करतात. ‘आपण कितीही धैर्यवान असलो, तरी अशा प्रसंगांमुळे मन खिन्न होतं. महिलांनी स्वतःचा बचाव करण्याची तयारी ठेवणं आवश्यक आहे,’ असा सल्लाही गिरीजाने मुलाखतीत दिला.
गिरीजा ओक ही फक्त स्टार नाही, तर मेहनतीने उभी राहिलेली कलाकार आहे. मुंबईत कॉलेज करताना लोकल हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होता. वर्गात जाणं, ऑडिशन्स देणं, नोकरी सांभाळणं या सर्व प्रवासांमध्ये लोकल तिची साथी होती. त्या काळातील अनेक सुंदर अनुभवांसह असे कटू प्रसंग तिला आजही आठवतात.मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक महिलांनी गिरीजाला पाठिंबा दर्शवत समान अनुभव शेअर केले. अनेकांनी लिहिलं की ‘हे आमच्या रोजच्या आयुष्याचं वास्तव आहे. याबद्दल कलाकारांनी उघडपणे बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे.’गिरीजाच्या कथनाने महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांविषयी जागरूकता वाढवण्याची गरजही नेटिझन्सकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :
Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
IPL 2026 पूर्वी ‘या’ 8 खेळाडूंना मिळाली नवी टीम…
भारतासाठी मोठी गुडन्यूज! डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय