इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आरक्षणाबाबत(reservation) पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी सर्वसाधारण, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षणाची सोडत नव्याने काढण्याचे आदेश महापालिकेला जारी केले आहेत. नव्या कार्यक्रमानुसार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात आरक्षणाची सोडत होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

याआधी 11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची (reservation)पहिली सोडत जाहीर झाली होती, ज्यामुळे काही उमेदवारांना त्यांच्या उमेदवारीबाबत खात्री वाटू लागली होती, तर काही जणांचा उत्साह कमी झाला होता. मात्र निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री सोडतीसंदर्भात नव्याने आदेश जारी करत नवीन आरक्षण निश्चित केले आहे. एससी, एसटी व नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीचे आरक्षण याप्रमाणे कायम राहणार आहे, तर सर्वसाधारण महिला आणि ओबीसी महिला आरक्षणाची संख्या नव्याने निश्चित होणार आहे.

या नव्या आरक्षणामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 16 प्रभागांतून 65 नगरसेवक निवडले जाणार आहेत आणि चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या प्रभागनिहाय निवडणुकीसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. उमेदवारांनी आपल्या रणनीतीत बदल करणे आवश्यक झाले असून, राजकीय वर्तुळात यावर भरपूर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा :

भाजपा उमेदवाराचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल, पण…

‘त्या माणसाने माझ्यावर हात फिरवला…’ गिरीजा ओकने सांगितलेले…

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *