रेंदाळ (ता. हातकणंगले) येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात (accident)रांगोळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष दादासो बाळासो पाटील (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या झालेल्या अकस्मात निधनाने गावात तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

दादासो पाटील हे कामानिमित्त हुपरी येथे गेले होते. काम उरकून सायंकाळी 5 च्या सुमारास परत येत असताना इचलकरंजी–हुपरी मार्गावर रेंदाळजवळील वळणावर त्यांच्या मोटारसायकलला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर–ट्रॉलीचा धक्का बसला. ट्रॉलीच्या मागील चाकाखाली ते पडले आणि चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने सकाळपासून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. सकाळीच सेवा संस्थेत समन्वय समितीची बैठक घेऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला होता. विशेष म्हणजे, गावातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्याच्या हेतूने पुस्तके देण्याचा मानस त्यांनी बैठकीत व्यक्त केला होता.

दिवसभर शुभेच्छांचे संदेश झेलल्यानंतर सायंकाळी त्यांच्या अपघाती(accident) निधनाची बातमी पसरताच गावकऱ्यांमध्ये दुःखाची लाट उसळली. सकाळी वाढदिवसाच्या पोस्ट आणि सायंकाळी श्रद्धांजलीच्या पोस्ट अशा विरुद्ध भावनांनी गाव सुन्न झाले.

हेही वाचा :
भीषण अपघात; तब्ब्ल ‘इतक्या’ भारतीयांचा मृत्यू…
आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; वाचा 24 कॅरेटचा दर
बिबट्यांची दहशत वाढली! पण उपाययोजना कठीण!