गेल्या काही दिवसांपासून सोने (Gold)आणि चांदीच्या भावात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. दिवाळीपूर्वी सोन्याचा भाव चांगलाच वाढला होता, मात्र आता तो घटत चालल्याचे दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्याची चमक कमी होत असून, यासोबतच चांदीच्या भावातही सुमारे चार हजार रुपयांची घट नोंदवली गेली आहे. अर्थविशेषज्ञांच्या मते, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील बदलती परिस्थिती, भारतावरील टॅरीफ कमी होण्याची शक्यता आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात संभाव्य घट यामुळे सोन्याचा भाव खाली आला आहे.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये 18 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता सोन्याचा भाव 1,719 रुपयांनी घटून 1,21,208 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दिवसभरात त्यात अजून 1,927 रुपयांची घट झाली आणि तो 1,21,000 रुपये प्रति दहा ग्रॅमावर गेला. याआधी बाजार सुरू होताना सोन्याचा भाव 1,22,121 रुपये आणि मागील दिवशी बंद बाजारभाव 1,22,927 रुपये होता.
गेल्या तीन दिवसांत सोन्याचा(Gold) भाव सलग घटत असून या काळात तो 5,751 रुपयांनी कमी झाला आहे. आपल्या सार्वकालिक उच्चांकांच्या तुलनेत सोन्याचा भाव सध्या 11,294 रुपयांनी खाली आला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, भविष्यातही सोन्याचा भाव अशाच पद्धतीने कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा :
इचलकरंजी येथील घरफोडीतील 11.16 लाखांचा ऐवज हस्तगत
सलमान खानसाठी 2026 कठीण? ज्योतिषांनी केली धक्कादायक भविष्यवाणी
लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर