साऊथ आफ्रिकेविरुद्ध चालू असलेल्या टेस्ट मालिकेत भारताने पहिला सामना गमावला आहे. त्यातच दुसऱ्या टेस्टपूर्वी कर्णधार शुभमन गिलच्या फिटनेसवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, ते या सामन्यातून बाहेर जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय कर्णधार(captain) शुभमन गिलला दुखापत झाली होती. यामुळे ते दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेच नाहीत. टीम मॅनेजमेंटनेही त्यांच्या दुखापतीबाबत तपशील उघड केलेला नाही. दुसरा टेस्ट सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटीत खेळला जाणार आहे. पण गिलची उपलब्धता अद्यापही संशयात आहे. बीसीसीआयने अधिकृतरीत्या काहीही जाहीर केलेलं नसून, लवकरच त्यांचा मेडिकल अपडेट येण्याची अपेक्षा आहे.

सध्याच्या मालिकेसाठी ऋषभ पंत उपकर्णधार(captain) आहे. त्यामुळे शुभमन गिल फिट नसल्यास टीमची धुरा पंतकडे सोपवली जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.सामन्यादरम्यान अनेक वेळा दिसून आले आहे की उपकर्णधारालाच कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी दिली जाते. त्यामुळे पंत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसू शकतात.गिलच्या जागी कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले जाईल, हा मोठा प्रश्न आहे. पहिल्या टेस्टमध्ये साई सुदर्शनला स्थान मिळालं नव्हतं, तर नंबर तीनवर वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यासाठी निवड करताना टीम मॅनेजमेंट पुढील पर्याय विचारात घेऊ शकते.

देवदत्त पडिक्कल: तांत्रिकदृष्ट्या मजबूत डावखुरा ओपनरगुवाहाटीची पिच कशी असेल, यावर अंतिम निर्णय अवलंबून असेल. विकेट बॅटिंगसाठी चांगली असल्यास साई सुदर्शन पुढे असतील. पण स्पिन किंवा मुव्हमेंटला मदत करणारी पिच असल्यास पडिक्कलचीही चर्चा होऊ शकते.पहिल्या सामन्यातील खराब खेळामुळे टीम इंडियावर आधीच टीका होत आहे. त्यात कर्णधाराच्या दुखापतीने संकट आणखी वाढलं आहे. भारतीय संघ दुसऱ्या टेस्टमध्ये ‘मस्ट विन’ परिस्थितीत उतरणार आहे. त्यामुळे पुढील काही तासांत शुभमन गिलच्या फिटनेस रिपोर्टकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

अल फलाह विद्यापीठ दहशतवाद्यांची फॅक्टरी?

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *