सोशल मीडियावर (social media)रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने ट्रेन येताच असे काही केलं आहे की पाहून तुमचीही झोपच उडेल. या भयावह व्हिडिओने अनेकांचा थरकाप उडाला आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे

व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्रेनच्या कॉकपिटमधून काढण्यात आला आहे. कदाचित हा व्हिडिओ कॉकपिटमधील सीसीटीव्ही फुटेज असावा. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रात्रीची वेळ आहे. ट्रेन जोरात वाऱ्याच्या वेगाने पळत आहे. आसपास सर्व सुनसान आहे. याच वेळी एका ठिकाणी अचानक एक माणूस ट्रेनसमोर येतो आणि ट्रॅकवर झोपतो.

लोको पायलटला काही समजायच्या आतच माणसाच्या अंगावरुन ट्रेन जाते. सध्या ही घटना नेमकी कुठे घडली? त्या माणसाचे पुढं काय झालं याबाबत कोणतीही माहिती नाही. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांच्या हार्ट बीट्सच थांबल्या आहेत. ही घटना अशी घडली की व्यक्तीला वाचवण्याची संधी देखील लोको पायलटकडे नव्हती.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्म एक्सवर @BrutalsOnly या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी त्या व्यक्तीबद्दल विचारले आहे. तर काहींनी व्यक्तीने स्वत:चा जीव घेतला असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. पाहणाऱ्यांनी तर श्वास रोखून धरला आहे. अनेक वेळा काही लोक असे स्टंट करत असतात. असेही काहींचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

राज ठाकरेंच्या एका आदेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

एस्कलेटवरुन सायकल चालवायला गेला अन्…; असं काही घडलं की पुन्हा करणार नाही धाडस, Video Viral

प्राची केंगार हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *