सोशल मिडियावर नुकताच एका आजोबांचा व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ तरुणांचा लाजवणारा व्हिडिओ कारण वय ओसरत असतानाही यात आजोबांनी (grandfather)असं काही करुन दाखवलं की पाहून सर्वच थबकले. स्कायडायव्हिंग हा एक साहसी खेळ आहे ज्यात पॅराशूटसह अवकाशातून थेट खाली उडी मारली जाते. हा खेळ तरुणांनाही घाबरवून सोडतो पण व्हिडिओत आजोबांच्या जोशाने मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित करुन सोडलं. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

हे आजोबा हरियाणातून आलेले असून त्यांचे वय ८० वर्षे आहे. वृद्धत्वात आपली हाडे ठिसूळ होऊ लागतात आणि उत्साह कमी होतो. पण व्हिडिओत आजोबा(grandfather) मात्र भारीच उत्साहात दिसून आले. त्यांनी १५,००० फूट उंचीवरून स्कायडायव्हिंग करून सोशल मीडियावर खळबळ उडवून टाकली. खरंतर आजोबांचा नातू त्यांना हा खेळ खेळवण्यासाठी घेऊन आलेला असतो. चेहऱ्यावर भितीची एकही रेष न आणता आपले साहस दाखवत ते अवकाशात झेप घेतात आणि हसत हसत लँडिंग करतात. जेव्हा त्यांचा नातू त्यांना विचारतो की, तुम्हाला भिती नाही वाटली का? तेव्हा ते छाती ताठ करुन सांगतात की अजिबात नाही, मी हरीयाणाचा आहे. व्हिडिओतील आजोबांचा उत्साह आणि त्यांचा साहस पाहून आता यूजर्स त्यांच्या हिमतीची प्रशंसा करत आहेत. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट आपल्याला आपल्या ध्येयापासून अडवू शकत नाही, हे यातून सिद्ध होते.
आजोबांच्या स्कायडायव्हिंगचा हा व्हिडिओ @ankitranabigmouth नावाच्या इंस्टाग्रामवरुन अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हरीयाणा ऑन टॉप” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजोबांना मानलं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आजोबा-नातवाची ही जोडी बेस्ट आहे”.

हेही वाचा :
लग्नाच्या 12 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री झाली आई, झेललं 3 वेळा गर्भपाताचं दु:ख
भाजपाकडून महायुती तोडण्याचा निर्णय…
जाती-धर्माच्या वादावर ऐश्वर्या रायचा तोडगा; म्हणाली, ‘फक्त हीच एक जात…’