कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
विविध शिक्षण संस्थांची शिखर संस्था म्हणजे विद्यापीठ होय. विविध शाखा मध्ये पदविका, पदवी ग्रहणकरणाऱ्या स्नातकांना विश्वविद्यालय तथा विद्यापीठाकडून समारंभ पूर्वक पदवी दान केली जाते.तथापि हरियाणाच्या फरीदाबाद येथील “अल फलाह”विद्यापीठाच्या महाविद्यालयांमधून दहशतवादी(terrorist) घडवले जातात की काय? हे विद्यापीठ म्हणजे दहशतवादी घडवणारी फॅक्टरी आहे की काय? असा कुणालाही संशय यावा. कारण नवी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात गेल्या सोमवारी कारस्फोट घडववणाऱ्यामध्ये आणि तसा कट रचणाऱ्यांमध्ये सर्वच जण डॉक्टर्स आहेत. आणि आता तर या विद्यापीठातील 15 पेक्षा अधिक डॉक्टर्स कॅम्पस सोडून पळाले आहेत.देशाविरोधी कटकारस्थान करणाऱ्या, प्रत्यक्षात दहशतवादी कारवायाकरणाऱ्या,देशद्रोह्यांमध्ये उच्चशिक्षित तरुण गुंतलेले आहेत असे चित्र गेल्या काही वर्षांपासून पुढे येऊ लागले आहे.

अल्फलाह विद्यापीठातून एमबीबीएस ची पदवी घेणारे, स्वतंत्र प्रॅक्टिस करणारे, विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करणारे डॉक्टर्स एकत्र येतात.त्यामध्ये एक सक्रिय महिला असते. शक्तिशाली स्फोटांची मालिका घडवून आणण्यासाठी ही मंडळी गेल्या दोन-तीन वर्षांपासून आवश्यक असलेले साहित्य संकलित करतात. रसायने गोळा करतात. आणि त्यापासून टायमर असलेलाबॉम्ब बनवतात.देशविरोधी कारवाई करण्यासाठी, दहशतवादी घटना घडवण्यासाठी काही उच्चशिक्षित तयारी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर यंत्रणांनी विविध ठिकाणी छापामारी करूनकाही डॉक्टर्सना ताब्यात घेतले. फोटो त्यासाठी आवश्यक असलेली साहित्य सामग्री त्यांच्याकडे मिळून आली. हा प्रचंड साठा पाहून तपास यंत्रणातील अधिकारी चक्रावून गेले होते.
आपल्या सहकाऱ्यांना अटक केलेली आहे हे समजल्यानंतर कटाचा म्होरक्या डॉक्टर उमर नबी यांनेच स्वतःसह कार मध्ये बॉम्ब स्फोट घडवून आणला. त्यामध्ये तेरा पेक्षा अधिक लोक ठार झाले.एन आय ए कडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, दहशतवाद्यांची(terrorist) पाळेमुळे उकडून टाकण्याचे प्रयत्न तपास अधिकाऱ्यांच्या कडून केले जात आहेत. देशभर आणि जगभर खळबळ उडवून देणाऱ्या या बॉम्बस्फोटात आणखी काही डॉक्टर मंडळींचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणेस आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी धाडसूत्र सुरू केले आहे. आणि अल फलाह विद्यापीठातील पंधरा पेक्षा अधिक डॉक्टर्स गायब झाले असल्याचे लक्षात आल्यानंतरया बॉम्बस्फोटाचे प्रकरण अधिक रहस्यमय आणि गंभीर बनले आहे.
मसूद अझर याच्या “जैश ए मोहम्मद”या दहशतवादी संघटनेशी अल फलाहा विद्यापीठातील डॉक्टर्स मंडळींचा थेट संपर्क असल्याचे तपासात पुढे आले आहे. या स्फोट प्रकरणाशीथेट संबंध असलेले सर्वच संशयित गुन्हेगार हे डॉक्टर आहेत हे वास्तव पुढे आल्यानंतर अधिक चर्चा सुरू झाली.ही उच्चशिक्षित मंडळी दहशतवाद्यांशी कशी काय संपर्कात आली या प्रश्नावर सध्या देशभर तथाकथित विचारवंतांच्याकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. आपण नकळतपणे या गुन्हेगार असलेल्या डॉक्टर मंडळींचेसमर्थन करत आहोत हेच या मंडळींच्या लक्षात आलेले नाही किंवा येत नाही. प्रतिकूल परिस्थिती मधून या उच्चशिक्षित तरुणांमधीलदहशतवादी विचार पुढे आले असा युक्तिवाद काहीजण करताना दिसतात.दहशतवाद्यांना धर्म नसतो हे पारंपारिक वाक्य नवी दिल्लीतील कार मधील शक्तिशाली स्फोटानंतर पुन्हा ऐकवले जाऊ लागले आहे.आत्तापर्यंतचे झालेले स्फोटकिंवा दहशतवादी हल्ले हेधर्मांध दहशतवाद्यांनी घडवून आणलेले असल्यामुळे त्यांना त्यांच्या धर्मापासून वेगळे करता येणार नाही.
आणि म्हणूनच सर्व दहशतवादी हे मुस्लिम आहेत, इस्लाम धर्मीय आहेत हे नाकारण्याचे कारण नाही.जगामध्ये असा एक भारत देश आहे की तिथेसर्वाधिक मुस्लिमांची लोकसंख्या आहे. इस्लामिक राष्ट्रांमध्ये सुद्धा तितकी लोकसंख्या नाही. याचा अर्थभारतामध्ये मुस्लिम धर्मीय मंडळी सर्वाधिक सुरक्षित आहेत. आणि या मुस्लिमांना भारताविरोधी विचार करायला लावण्याचे प्रयत्न दहशतवादी संघटनांच्या कडून तसेच डॉक्टर झाकीर नाईक यांच्यासारख्या कडव्या मौलवीकडून सुरू आहेत. या प्रयत्नातूनच काही मूठभर मुस्लिम फुटीरतेचा विचार करू लागले आहेत. त्यातीलच काहीजण दहशतवादी संघटनांसाठी स्लीपर सेल म्हणून काम करताना दिसतात.
या मंडळींचा व्यवहार सर्वसाधारण लोकांच्या सारखाच असतो. त्यांना आदेश आल्यानंतर तर ते दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी सक्रिय होताना दिसतात.स्लीपर सेलचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न राष्ट्रीय तपास यंत्रणांच्याकडून सुरूअसताना अल् फलाह विद्यापीठातील डॉक्टरांचे कारनामे उघडकीस आले.भारतीय तपासणी यंत्रणांचे हे सर्वात मोठे यश मानले जाते.नवी दिल्ली येथील बॉम्बस्फोटा प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीकुणालाही सोडणार नाही असा सज्ज इशारा दिला असल्यामुळे, नजीकच्या काळात भारताकडून आंतरराष्ट्रीय जगताने दखल घेतली पाहिजे अशी कारवाई केली जाण्याची शक्यता दाट आहे.

हेही वाचा :
ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…
लोकांना”पागल”करणारं राजकारणातलं “कागल”