इंदुरीकर महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. मात्र यावेळी त्यांच्या स्वत:च्या लेकीच्या साखरपुड्याच्या व्हिडीओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संगमनेरच्या वसंत लॉन्स येथे थाटामाटात झालेल्या या कार्यक्रमात तब्बल साडेतीन हजार लोकांची उपस्थिती होती. हा सोहळा जितका भव्य होता, तितकेच त्यानंतर व्हायरल झालेले व्हिडीओ समाजात मोठ्या प्रमाणावर टीका (statement)आणि नाराजी निर्माण करत आहेत.इंदुरीकर महाराज अनेकदा साधेपणाचा आणि संयमाचा उपदेश करतात. मात्र, लेकीच्या साखरपुड्यातील भव्य तयारी, मोठ्या गाड्यांचा ताफा आणि सनरूफमधून मुलीने केलेल्या एंट्री नंतर अनेकांनी दुहेरी निकषांचा आरोप केला आहे. ‘दुसऱ्यांना साधे लग्न करा’ म्हणणारे महाराज स्वत:च्या लेकीच्या कार्यक्रमात पैशांची उधळण करताना दिसल्याने लोकांच्या भावना अधिक चिघळल्या आहेत.

इंदुरीकर महाराज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे नव्या वादात सापडले आहेत. मुलींच्या कपड्यांविषयी बोलताना त्यांनी केलेले विधान समाजात खळबळ माजवत आहे. काही दिवसांपूर्वी तेच इतरांच्या मुलींच्या कपड्यांवर भाष्य करत होते, मात्र स्वत:च्या लेकीबद्दल टीका झाली तेव्हा त्यांनी संताप व्यक्त केला, असा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.व्हिडीओमध्ये महाराज म्हणतात, “तुम्हाला आम्ही कपड्यांवरून बोललो तर राग येतो… केसांवरून बोललो तर राग येतो… सध्या तुमच्याकडे ५० टक्के जागा असल्याने तुम्ही काहीही करू शकता. आम्ही म्हटलं महिलांनी व्यवस्थित कपडे घालावेत, तर म्हणतात महाराज लोक महिलांना बोलतात. आम्ही म्हटलं पोरींनी पोरांचे कपडे घालू नयेत तर म्हणतात देशात लोकशाही आहे.”

वाद अधिक वाढवणारे वक्तव्य म्हणजे महाराजांनी दिलेली धमकीसदृश टिप्पणी. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला आहे की, दुसऱ्यांच्या मुलींबद्दल मुक्तपणे मत मांडणारे महाराज, स्वत:च्या कुटुंबाविषयी टिप्पणी झाली तेव्हा एवढा संताप व्यक्त करतात? लेकीच्या कपड्यांपासून ते भव्य कार्यक्रमापर्यंत अनेक मुद्द्यांवरून त्यांच्यावर टीका होत असतानाच आत्ताचे विधान अधिकच खळबळजनक ठरले आहे(statement). महाराजांनी टीकेला उत्तर देताना मोठ्या आवाजात सांगितले की, “साखरपुड्यापेक्षाही जास्त मोठे लग्न करणार, जे करायचं ते करा!” अशा प्रकारची भूमिका घेत त्यांनी टीकेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा :

200 कोटींचं अमिष आणि 30 कोटींची फसवणूक; सुप्रसिद्ध दिग्दर्शक व त्यांच्या पत्नीसह 8 जणांविरोधात FIR

राज ठाकरेंविरुद्ध गुन्हा दाखल करा…

पैसे काढण्यापूर्वी तुम्हीही ATM मशिनवरचं Cancel बटण Press करताय? असं केल्यानं Bank Accountला धोका?

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *