भारतीय क्रिकेटर(cricketer) हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री-मॉडेल माहिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर माहिकासोबत रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामुळे फॅन्समध्ये त्यांच्या रिलेशनबद्दल उत्सुकता वाढली आहे.

हार्दिकच्या पोस्टमध्ये “बिक-3” असं कॅप्शन असून, त्याने सांगितलं आहे की “अगस्त्य, पेट डॉग आणि माहिका” हे त्याच्यासाठी आयुष्यात महत्त्वाचे आहेत. मात्र, या पोस्टमधील व्हिडिओमुळे चर्चांना नवीन दिशा मिळाली आहे. व्हिडिओमध्ये दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये प्रार्थना करताना दिसत आहेत, आणि माहिकाच्या बोटात हिऱ्याची अंगठी असल्यामुळे फॅन्समध्ये चर्चा उधाणली आहे की, “हार्दिकने माहिकाला पत्नी म्हणून स्वीकारलं आहे का?”
साथच, हार्दिकने (cricketer)काही फोटोही शेअर केले आहेत ज्यात तो माहिकासोबत जीममध्ये व्यायाम करताना दिसतोय, तर एका फोटोमध्ये तो माहिकाला उचललेला आहे. या फोटोंवरून दोघांमध्ये गाढ प्रेम असल्याचे स्पष्ट होते.सध्यातरी, हार्दिक-माहिका एकमेकांच्या प्रेमात आहेत; मात्र लग्नाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त समोर आलेले नाही. फॅन्स उत्सुकतेने त्यांच्या पुढील निर्णयाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा :
जाणून घ्या आजचे राशिभविष्य…
या ठिकाणी स्वास्तिक काढण्याची कधीच करू नका चुक, नाहीतर होईल पश्चात्ताप
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे.