गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात घटस्फोटांच्या(divorces) बातम्यांनी जोर धरला असताना, मलयाळम अभिनेत्री मीरा वासुदेवन हिने तिच्या तिसऱ्या घटस्फोटाची अधिकृत घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की ती ऑगस्ट 2025 पासून अधिकृतरित्या अविवाहित आहे. मीरा आणि सिनेमॅटोग्राफर विपिन पुथियाकम यांचे गेल्या वर्षी मे महिन्यात कोयंबतूर येथे लग्न झाले होते; मात्र अवघ्या एका वर्षात त्यांच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण होऊन दोघांनी कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मीरा सध्या “आयुष्यातील शांत टप्प्यात” असल्याचे म्हणत असली तरी विभक्त होण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही. ‘कुडुंबविलक्कु’ मालिकेच्या सेटवर त्यांची ओळख प्रेमात बदलली होती, पण हे नाते अल्पकाळातच तुटले. आधीच दोन विवाह तुटलेली मीरा वासुदेवनची ही तिसरी वैवाहिक गुंतवणूकही अपयशी ठरल्याने चाहत्यांमध्ये आश्चर्य आणि सहानुभूतीची भावना व्यक्त होत आहे(divorces).

हेही वाचा :
तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच…
राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…
9 कोटी शेतकऱ्यांची आज भरणार ‘झोळी’, PM Modi देणार 2 हजार