कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी:
निवडणुका (elections)तोंडावर आल्या,जाहीर झाल्या, की मग आयाराम गयाराम ही संधीसाधू प्रवृत्ती उफाळून वर येते. कुणाचे तळ्यात आणि मळ्यात चालते तर कोणी ऑफरच्या प्रतीक्षेत असतो तर कोणी राजकीय फायदा कुठे मिळेल असा विचार करत बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका सुद्धा त्याला अपवाद नाहीत. सध्या तरफोडाफोडीच्या राजकारणाला इतका ऊत आला आहे की,महायुतीमध्ये सुद्धा वादाच्या,रागाच्या ठिणग्या पडू लागल्या आहेत. त्याचे मंगळवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटले.नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवल्यानंतर महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे कुणीही म्हणणार नाही.एकापेक्षा अधिक पक्ष सत्तेसाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यामध्ये किमान समान कार्यक्रम ठरवला जातो. महायुती किंवा आघाडी मजबूत राहण्यासाठी इतरही काही अलिखित नियमावलीकेली जाते.

महाविकास आघाडी पाच-सहा वर्षांपूर्वी अस्तित्वात आली तेव्हा घटक पक्षांना त्यांचा नवीन राजकीय मित्र शोधण्याची किंवा जोडण्याची परवानगी होती.तेव्हा त्याप्रमाणे काही प्रमाणात घडले सुद्धा. प्रकाश आंबेडकर हे शिवसेनेचे मित्र बनले होते. जागा वाटपात त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही असे दिसल्यावर त्यांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली होती.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी सुद्धा सध्या अडचणीत आली आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यास काँग्रेसने विरोध केल्यानंतर, आणि आता स्वबळाची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाली आहे.शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार आणि भारतीय जनता पक्ष यांची जेव्हा महायुती झाली तेव्हाअजितदादा यांना त्यांची वेगळी राजकीय वैचारिक बैठक मांडण्यास मुभा देण्यात आली होती.
त्यामुळे ते हिंदुत्वाच्या विचाराच्या जवळपासही आलेले नव्हते आणि नाहीत. याशिवाय घटक पक्षाच्या नेत्यांनीत्यांचा पक्ष विस्तार करतानाघटक पक्षाच्याकार्यकर्त्यांनापक्षात प्रवेश द्यायचा नाही.परस्पर पक्षांचे कार्यकर्ते फोडायचे नाहीत. इनकमिंग आपापसात करायचे नाही असे ठरले होते आणि आहे.पण आता महायुतीमध्ये जे काही ठरले होते, त्याचे विस्मरण घटका पक्षाच्या नेत्यांना झालेले दिसते. विशेषतः भारतीय जनता पक्षाने अलिखित नियम मोडीत काढला असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात पहावयास मिळते.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या आणि तेथे आपला नगराध्यक्ष आणायचा असे धोरण भारतीय जनता पक्षाचे आहे.
नगराध्यक्ष पदाची थेट जनतेतून निवडणूक होणार असल्यानेइलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना आपल्या पक्षात आणायचे. त्यासाठी ज्या त्या स्थानिक नेतृत्वाला भारतीय जनता पक्षाने अधिकार दिले आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दुय्यम फळीतील कार्यकर्ते फोडले गेले आहेत. महायुती मधील भाजपमध्ये सर्वाधिक इनकमिंग होताना दिसते आहे. वास्तविक हे इनकमिंग महाविकास आघाडीच्या घटक (elections)पक्षातून होणे अपेक्षित आहे. पण महायुतीमधूनच इनकमिंग होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कमालीचे नाराज होणे अपेक्षित आहे.महायुती मधील शिवसेनेच्या काही नेत्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपामध्ये होत असलेल्या इनकमिंग बद्दल नाराजी व्यक्त केली. प्रताप सरनाईक यांनी ही नाराजी मीडियासमोर बोलूनही दाखवली आहे.नगरपरिषद, नगरपंचायतीयांच्या निवडणुका सध्या सुरू आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका व्हावयाच्या आहेत. तेव्हा तर आपल्याच पक्षाचा महापौर झाला पाहिजे म्हणून “इनकमिंग वॉर”झाले नाही तरच नवल!

हेही वाचा :
प्रसिद्ध अभिनेत्रीचा 43 व्या वर्षी तिसऱ्यांदा घटस्फोट, थेट म्हणाली, मी अविवाहित असून …
तीन वर्षांच्या मुलीचं लैंगिक शोषण करून डोकं ठेचलं; घरी मृतदेह येताच…
राज्यातल्या ‘या’ भागातील शाळांच्या वेळेत बदल…