भारतामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड. सरकारी योजना असोत किंवा बँकिंगसारख्या महत्वाच्या सेवा, प्रत्येक ठिकाणी आधार क्रमांक अत्यावश्यक मानला जातो. पण दिवसेंदिवस वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे आधार माहितीची सुरक्षा हा गंभीर प्रश्न बनला होता. आता UIDAI ने याच पार्श्वभूमीवर आधारकार्डमध्ये ऐतिहासिक बदल(change) करण्याची तयारी सुरू केली असून, लवकरच नागरिकांना एक नवीन सुरक्षित आधारकार्ड उपलब्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या आधारकार्डवर नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक यांसह अनेक वैयक्तिक तपशील छापलेले असतात. यामुळे त्याच्या छायाप्रतीचा गैरवापर करणे तुलनेने सोपे होते. अनेक संस्था आधारच्या झेरॉक्स प्रती गोळा करतात आणि त्यांना जतनही करतात, ज्यामुळे गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. हे सर्व थांबवण्यासाठी UIDAI ने मोठी सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले की, नागरिकांच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी आणि ऑफलाइन पडताळणीच्या प्रक्रियेमुळे (change)होणारा गैरवापर थांबवण्यासाठी डिसेंबरमध्ये एक नवा नियम लागू होऊ शकतो. या नियमांनुसार नवीन आधारकार्डमध्ये नाव, पत्ता किंवा कोणतीही वैयक्तिक माहिती छापली जाणार नाही. कार्डवर फक्त धारकाचा एक फोटो आणि एन्क्रिप्टेड QR कोड असणार आहे, ज्यातून अधिकृत पडताळणी सहज होऊ शकेल.

कुमार यांनी स्पष्ट केले की, कार्डावर जास्त माहिती छापल्यास तिचा गैरवापर होण्याची शक्यता नेहमीच जास्त असते. QR कोडच्या मदतीने फक्त अधिकृत व्यक्तीलाच आवश्यक माहिती मिळेल, ज्यामुळे फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. हा बदल गोपनीयता, सुरक्षा आणि डिजिटायझेशनच्या दिशेने मोठे पाऊल मानला जात आहे.

नवीन कार्डमध्ये छापलेला QR कोड पूर्णपणे एन्क्रिप्टेड असेल, ज्याचे डिकोडिंग केवळ UIDAI-मान्यताप्राप्त अॅप किंवा यंत्रणेमार्फतच शक्य असेल. त्यामुळे कोणालाही आधारकार्डची छायाप्रती मिळाली तरी त्यातून तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक किंवा इतर वैयक्तिक माहिती उघड होणार नाही. हे गोपनीयतेचे मोठे संरक्षण ठरणार आहे.

आधार कायद्यानुसार ऑफलाइन पद्धतीने आधार क्रमांक किंवा बायोमेट्रिक माहिती गोळा करणे किंवा संग्रहित करणे आधीच नियमबाह्य आहे. तरीही अनेक संस्था ही माहिती मागतात आणि ती त्यांच्या डेटाबेसमध्ये ठेवतात. या सर्व व्यवहारांवर आता मोठ्या प्रमाणात निर्बंध येऊ शकतात. नवीन आधार कार्डच्या माध्यमातून डिजिटल व सुरक्षित पडताळणीची प्रक्रिया अधिक वेगवान, सोपी आणि पूर्णपणे सुरक्षित होणार आहे.

हेही वाचा :

सोन्याचा भाव धडाम, झटक्यात 5 हजारांनी स्वस्त; आता 10 ग्रॅमसाठी फक्त…

इचलकरंजी येथील घरफोडीतील 11.16 लाखांचा ऐवज हस्तगत

सलमान खानसाठी 2026 कठीण? ज्योतिषांनी केली धक्कादायक भविष्यवाणी

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *