स्मृती मंधाना 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छलसोबत विवाहबंधनात(marriage) अडकणार आहे. दोघांच्या नात्याबद्दल गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चा सुरू होती, आणि अखेर स्मृतीने एका मजेदार इंस्टाग्राम रीलद्वारे आपली एंगेजमेंट अधिकृतरीत्या कन्फर्म केली आहे. पण त्याहूनही जास्त चर्चा होत आहे तिच्या व्हायरल डान्स व्हिडिओची, ज्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

हा व्हिडीओ स्मृतीने आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि अरुंधती रेड्डी सोबत शूट केला आहे. गुरुवारी 20 नोव्हेंबरला हा व्हिडीओ पोस्ट होताच इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. रीलमध्ये सगळे मिळून ‘लगे रहो मुन्ना भाई’ चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘समझो हो ही गया’ वर एक छोटासा, कोरिओग्राफ केलेला डान्स करताना दिसतात. व्हिडीओच्या शेवटच्या फ्रेममध्ये स्मृती कॅमेऱ्यासमोर आपली एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करते आणि अशा रीतीने आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावते.
स्मृतीचा हा रील पोस्ट होताच चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. टीम इंडिया स्टार जसप्रीत बुमराहची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनने कमेंट करत लिहिले, “Internet वर आजचं सर्वात सुंदर गोष्ट हीच!” अलीकडेच इंदूरमध्ये पलाशने एका कार्यक्रमात म्हटले होते, “लवकरच स्मृती इंदूरची सून होणार आहे.” तेव्हापासून दोघांच्या लग्नाच्या बातम्या जोरात होत्या.
महिला ODI वर्ल्ड कपच्या रोमांचक अंतिम सामन्याला पलाश मुच्छल DY पाटील स्टेडियममध्ये प्रत्यक्ष उपस्थित होता. भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर तो स्मृतीला भेटण्यासाठी मैदानात आला होता. दोघांचा सेलिब्रेशन व्हिडीओही तेव्हा खूप व्हायरल झाला होता. स्मृतीने या वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करत नऊ सामन्यांत 434 धावा केल्या आणि टीमची टॉप रन-स्कोरर ठरली. उपकर्णधार म्हणून तिने भारताच्या मोहिमेत महत्त्वाचा वाटा (marriage)उचलला.तिचा करियरमधील सर्वात मोठा क्रिकेट क्षण साजरा केल्यानंतर स्मृती आता तिच्या आयुष्यातील आणखी एका मोठ्या टप्प्याकडे लग्नाकडे वाटचाल करत आहे.

हेही वाचा :
कोरोनाची लागण झालेल्यांच्या रक्तात निर्माण होतायेत गुठळ्या, संशोधनात धक्कादायक खुलासे
आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने…
जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ