बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने अखेर चाहत्यांच्या उत्सुकतेचा अंत करत आपल्या दुसऱ्या गरोदरपणाची अधिकृत घोषणा केली आहे. काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नंसीबद्दल चर्चा रंगत होत्या आणि सोनमने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमधून त्या सर्व बातम्यांना पुष्टी दिली(photoshoot). गुलाबी वनपीस, ब्लेझर आणि स्टॉकिंग्ससह बॉसी लूकमध्ये सोनमने बेबी बंप सुंदरपणे फ्लॉन्ट केला असून, कॅप्शनमध्ये फक्त “mother” लिहून तिने हा आनंदाचा क्षण जगासमोर मांडला.

या फोटोशूटला तिच्या बहीण रिया कपूरने स्टाईल केलं असून, सोनमचे हे फोटो(photoshoot) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट करून सोनम आणि आनंद आहुजा दाम्पत्याला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. चाहतेदेखील सोनमच्या या गुड न्यूजने आनंदित झाले आहेत.
सोनम कपूर वयाच्या 40व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होत आहे. 2022 मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला होता, ज्याचे नाव ‘वायू’ आहे. आता कपूर आणि आहुजा कुटुंबात पुढील वर्षी नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अनिल कपूरही दुसऱ्यांदा आजोबा होणार असल्याने विशेष उत्साह व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :
कोल्हापुरात दोस्तीत कुस्ती! दोन मंत्रीच एकमेकांना भिडले,उमेदवार अज्ञातस्थळी हलवले
80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral
लग्नाच्या 12 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री झाली आई, झेललं 3 वेळा गर्भपाताचं दु:ख