टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू’ आणि ‘डोली अरमानों की’मधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा मर्दा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष भावनिक शब्दांत मांडले. करिअरकेंद्रित असल्याचे टोमणे आणि कुटुंब वाढवण्याबाबत (mother)सतत येणाऱ्या प्रश्नांचा तिला किती मानसिक त्रास झाला होता, हे तिने स्पष्टपणे सांगितले. “पार्ट्यांमध्ये कुणीही विचारायचं की, अजूनही एकटीच का? मला तेव्हा वाटायचं की आयुष माझ्यासोबत आहे, मग मी एकटी कशी? पण नंतर कळलं की ते बाळाबद्दल विचारत होते,” असे ती म्हणाली.

नेहाने सांगितले की तिच्या मागे ‘आता तरी गरोदरपणाचा विचार कर’ अशी चर्चा सतत होत असे. “काम होतच राहील, पण मूल होणं महत्त्वाचं आहे” असे लोक म्हणत. तथापि, नेहाने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग कोणालाच सांगितला नव्हता—तिचे तीन वेळा गर्भपात(mother) झाले होते. लग्नानंतर 3, 6 आणि 9 वर्षांनी तीने हे दुःख सोसले, परंतु कोणाची सहानुभूती नको म्हणून ती शांत राहिली.

शेवटी 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, वयाच्या 34व्या वर्षी नेहाने मुलीला जन्म दिला. “मुलीचा जन्म हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद होता. त्यानंतर मी नव्या ऊर्जेने माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला,” असे सांगत नेहाने तिच्या संघर्षातून मिळालेल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.

हेही वाचा :
नवी मुंबईत ‘या’ एरियात दिसला बिबट्या! Video समोर, स्थानिकांमध्ये दहशत
सेलिब्रिटींचा यारों का यार ओरी अडचणीत; 252 कोटींच्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात…
हार्दिक पांड्याने गुपचपू केलं लग्न? गर्लफ्रेंड माहिकासोबत…