गुजरातच्या राजकोटमधील नागेश्वर भागात एका धक्कादायक कौटुंबिक वादातून दुर्दैवी घटनेचा उलगडा झाला आहे. 20 वर्षांपासून विवाहित (wife)असलेल्या लालजी आणि त्रिशा यांच्या संसारात भाचा विशालच्या प्रवेशानंतर तणाव वाढत गेला. कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या लालजीला एका दिवशी अनपेक्षितपणे घरी परतल्यावर आपल्या पत्नीला आणि सख्ख्या भाच्याला नको त्या अवस्थेत पाहून मोठा धक्का बसला. या प्रकारानंतर त्रिशा घर सोडून मैत्रीण पूजाकडे राहायला गेली, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली.

लालजीने संसार टिकवण्यासाठी प्रचंड धडपड केली. मुलाच्या भविष्यासाठी आणि पत्नीवरील प्रेमासाठी तो पुन्हा एकत्र येण्यास तयार होता. घर, पैसे, दागिने सर्व काही पत्नीला(wife) देण्याची तयारीही त्याने दाखवली. मात्र, त्रिशावर मैत्रीण पूजा आणि भाचा विशाल प्रभाव टाकत असल्याचा लालजीच्या कुटुंबाचा आरोप आहे. एक महिन्यापूर्वीच त्रिशा आणि विशाल यांनी लालजीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली होती, ज्यामुळे त्याला काही काळ ताब्यातही राहावे लागले.
वाद सतत चिघळत असतानाच काल अखेर परिस्थितीने अत्यंत भयावह वळण घेतले. संतापाच्या भरात लालजीने पिस्तूलातून गोळी झाडून प्रथम पत्नीवर हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गंभीर जखमी झालेली त्रिशा रुग्णालयात उपचाराधीन असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
पोलिसांनी सांगितले की ही घटना पूर्णपणे कौटुंबिक वादातून उद्भवलेली असून घटनेमागील सर्व बाजूंची बारकाईने चौकशी सुरू आहे. राजकोट परिसरात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :
सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट
कोल्हापुरात दोस्तीत कुस्ती! दोन मंत्रीच एकमेकांना भिडले,उमेदवार अज्ञातस्थळी हलवले
80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral