भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार(captain) शुभमन गिल दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे. शुभमन गिलच्या दुखापतीच्या निमित्ताने एका नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. शुभमन गिल सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपपासून सलग खेळत आहे. इतर खेळाडूंना वेगवेगळ्या फॉरमॅटप्रमाणे फिरवलं जात असलं तरी 25 वर्षी शुभमन गिल गेल्या महिन्यात चारही मालिकांमध्ये खेळला आहे. गेल्या आठवड्यात ईडन गार्डन्सवर मानेला दुखापत झाल्यानंतर आता त्याला विश्रांती देण्यात आली आहे.दुखापतीमुळे शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. भारताला ही मालिका वाचवण्यासाठी दुसऱ्या कसोटीत विजय मिळवणं आवश्यक आहे. यानंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या कर्णधाराच्या वर्कलोड मॅनेजमेंटसंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.

मात्र भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने वर्कलोड मॅनेजमेंटची संकल्पना फेटाळून लावली. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मीडिया डे दरम्यान बोलताना, आकाश चोप्राने खुलासा केला की जेव्हा त्यांनी गंभीरला या मुद्द्याबद्दल विचारलं तेव्हा त्याने उत्तर दिलं की गिलला विश्रांतीची आवश्यकता (captain)असल्यास त्याने आयपीएल खेळणं टाळावं.”वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी मी गौतमला हा प्रश्न विचारला होता. त्याचा मुद्दा असा होता की जर तुम्हाला वर्कलोड मॅनेजमेंटची गरज असेल तर आयपीएल खेळणं टाळा. आयपीएल संघ फार दबाव टाकत असल्याने तुम्हाला नेतृत्व करायचं नसेल तर नेतृत्व करू नका. भारतासाठी खेळताना, जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले नसता,” असं आकाश चोप्राने सांगितलं.
आकाश चोप्राने गंभीरच्या मताशी आपण सहमत असल्याचं सांगितलं आहे. जोपर्यंत खेळाडू मानसिक थकवा अनुभवत नाही तोपर्यंत त्यांनी खेळत राहिलं पाहिजे असं त्याने सांगितलं आहे. “एक फलंदाज म्हणून, मी हे देखील मत मांडू शकतो की जेव्हा तुम्ही चांगल्या फॉर्ममध्ये असता तेव्हा तुम्हाला खरोखर जास्तीत जास्त कामगिरी करायची असते. कारण वाईट फॉर्म कधी येतो आणि नंतर काय होणार हे तुम्हाला कधीच कळत नाही,” असं त्याने म्हटलं. “जर तुम्ही फिट असाल आणि मानसिक थकवा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त खेळा,” असा सल्लाही त्याने दिला आहे. बीसीसीआयने अद्याप शुभमन गिलला अधिकृतपणे संघाबाहेर केलं नसलं तरी, गिलला बरं होण्यासाठी आणि सामन्यासाठी तयार होण्यासाठी किमान 10 दिवस विश्रांतीची आवश्यकता असल्याचे वृत्त आहे.
30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि त्यानंतर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी तो वेळेत बरा होईल अशी भारताला आशा आहे.

हेही वाचा :
लग्नाआधी स्मृती मानधनाचा डान्स व्हायरल, बुमराहच्या पत्नीचीही कमेंट
सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय…
राज्यावर पुन्हा संकट! थंडीसोबतच कोसळधार पाऊस, अलर्ट जारी, मोठा इशारा