भारतातील टेलिकॉम कंपन्या रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ करू शकतात, अशी अपडेट गेल्या अनेक दिवसांपासून समोर येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रिचार्ज प्लॅनच्या वाढत्या किंमतींबाबत सर्वत्र चर्चा सुरु असतानाच आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने काही रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यूजर्स नाराज झाले आहेत.

कंपनी बऱ्याच काळापासून दावा करत आहे की, खाजगी टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे BSNL रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करत नाही. मात्र कंपनीने व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यूजर्स नाराज झाले आहेत. काही यूजर्सनी सोशल मीडियावर BSNL वर शांतपणे दर वाढवण्याचा आरोपही केला आहे. कंपनीने कोणत्या प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे, जाणून घेऊया.
99 रुपयांचा रिचार्ज (recharge)प्लॅन
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हिलीडीटी 14 दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 50MB डेटा मिळतो.
107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
यापूर्वी या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनमध्ये 22 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग आणि 3GB डेटा उपलब्ध आहे. व्हॅलिडिटी कमी झाल्यानंतर प्लॅनची किंमत 20 टक्क्यांनी वाढल्यासारेख वाटत आहे.
147 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
पूर्वी 25 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी आता 24 दिवस झाले आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5GB डेटा दिला जातो.
153 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 25 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हिलीडीटी 24 दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.
197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 48 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 42 दिवसांची झाली आहे. या प्लॅनमध्ये 300 मिनिटे कॉलिंग आणि 4GB डेटा मिळणार आहे.
439 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
पूर्वी 90 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी आता 80 दिवस झाली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर केले जातात.
879 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
यापूर्वी या प्लॅनमध्ये 180 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडिटी 165 दिवस झाली आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 24GB डेटा मिळतो.

हेही वाचा :
कोरोनाची लागण झालेल्यांच्या रक्तात निर्माण होतायेत गुठळ्या, संशोधनात धक्कादायक खुलासे
आधी विवाहित महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट यायची, त्यानंतर जे घडायचं त्याने…
जयसिंगपूरमध्ये सतेज पाटील, महाडिक, राजू शेट्टी साथ साथ