सांगलीतील क्रिकेटप्रेमी(cricketer) आणि मानधना परिवारासाठी आजचा दिवस विशेष ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि सांगलीचा अभिमान मानली जाणारी स्मृती मानधना यांच्या शाही विवाहसोहळ्याची अंतिम तयारी जोरात सुरू झाली आहे. 23 नोव्हेंबरला पार पडणाऱ्या या महत्त्वाच्या सोहळ्यापूर्वी कवठेपिरांन रोडवरील मानधना फार्महाऊस चक्क प्रकाशमहालाप्रमाणे सजवले गेले असून लग्नसोहळ्यात सहभागी होण्यासाठी मान्यवर, कुटुंबीय आणि सेलिब्रेटीज सांगलीत दाखल होत आहेत

काल रात्री स्मृतींच्या हळदीचा समारंभ रंगला तर आज मेहंदी आणि संगीताच्या कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण रंगतदार झाले आहे. कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी अचानक सांगली पोलीस आणि डॉग स्क्वॉड फार्महाऊसवर दाखल झाल्याने पाहुण्यांमध्ये थोडीशी काळजी निर्माण झाली होती; मात्र हा फक्त सुरक्षा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट करताच वातावरण पुन्हा उत्साहाने गजबजले. दरम्यान, मानधना फार्महाऊसमध्ये काल रात्री एक वेगळाच आनंद साजरा झाला — “शादी प्रीमियर लीग”! स्मृती, त्यांचे होणारे पती पलाश मूछल, महिला क्रिकेट संघातील खेळाडू आणि पाहुण्यांनी छोटेखानी क्रिकेट सामना खेळत लग्नाचा आनंद क्रिकेट स्टाईलमध्ये साजरा केला.
पलाश मूछल सांगलीत त्यांच्या वऱ्हाडासह दाखल झाले असून मानधना कुटुंबीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. उद्या संध्याकाळी स्मृती (cricketer)आणि पलाश यांच्या या बहुप्रतिक्षित शाही विवाहसोहळ्याचा ग्रँड अध्याय सांगलीत साक्षीदार ठरणार आहे. क्रिकेट, संस्कृती आणि आनंदाचा संगम झालेल्या या विवाहसोहळ्याने सांगली शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण केले आहे.

हेही वाचा :
मालेगाव बलात्कार अन् हत्या प्रकरणावरुन काँग्रेस आक्रमक; सरकारकडे केली ‘ही’ मोठी मागणी
डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा महामारी येणार! नव्या भविष्यवाणीने जग हादरले
वहिणीने मध्यरात्री दीराला बंद खोलीत बोलावले, नंतर त्याचा प्राइवेट पार्ट…